Summary of the Book
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सिद्ध केलेल्या देशातील विविध प्रांतांमधील पाककृतींचे हे दोन संग्रह आहेत. दक्षिण भारतातील पाककृतींमध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, उडीसा, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांतील पाककृतींचा समावेश आहे.
त्यामुळे, उंधीऊ, खांडवीपासूनसावजी रस्सा, कोल्हापुरी सुकं मटण, कोलंबीचं लोणचं, तळलेली सुरमई, टोमॅटो रस्सम, म्हैसूर पाक, गोड इडली, मसूर आबोटपर्यंत आणि मद्रासी पकोडा, अवीयल, ऑनीवडा, रेशमी कबाब, अल्लम पचडी, सिंटकाई पचडी, म्हैसूर बोंडा, खामिरी रोटी, पोटोला रस्सा, कडाली भाज्या, छेना जेलेबी, संतुला, काकेरा, पनीर कचोरी, बिन तेलाचा दहीवडा, रखिया वडी, गराडू, इंदोरी पॅटीस, मोती टिकिया अशा वैविध्यपूर्ण पदार्थांच्या कृतींचा पुस्तकात समावेश केला आहे.