Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
लठ्ठपणा उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, तसेच मेंदूतील रक्तस्त्राव अशा अनेक असांसार्गिक रोगांचे भारत देश हा आगर बनला आहे. लठ्ठपणा हा स्वतः एक आजार आहेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्यामुळे उपरोक्त इतर रोग होण्याची जोखीम वाढते. इन्सुलिन हे संप्रेरक आपल्याला लठ्ठ बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. कर्बोदके असलेले खाणे वारंवार खाण्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते. या वाढलेल्या इन्सुलिनचे दुष्परिणाम म्हणजेच वर वर्णन केलेले रोग होत. सध्या लठ्ठपणा कमी करणे हा अनेकांचा धंदा बनला आहे. दुर्दैवाने हजारो रुपये खर्च करुनही लोकांचा पदरी निराशाच येते. लठ्ठ लोक हताश होतात. या पुस्तकात सुचवलेला उपाय हा साधा-सोपा तर आहेच, पण बिनखर्ची आहे. त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही वा महागडी उपकरणे किंवा विशिष्ट अशा आहाराचीही गरज नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणीही व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर हा उपाय अंगीकारु शकेल. रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी करणारा हा उपाय लठ्ठपणाबरोबरच मधुमेहाच्या प्रतिबंधासाठीही उपयुक्त ठरेल. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा उपाय म्हणूनच बहुमूल्य असाच आहे. कै. डॉ. श्रीकांत जिचकारांनी त्यांच्या मृत्युपर्यंत शास्त्रोक्त विवेचनाद्वारे व समजा-प्रतीच्या तळमळीने हा उपाय व्याख्यानांद्वारे महाराष्ट्र व देशात पोचवला. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी डॉ. जिचकारांचा हा ज्ञानदीप पुस्तकरूपाने सर्व भारतीयांसमोर आणला आहे. आता हि चळवळ 'स्थूलत्व व मधुमेहमुक्त भारत' या अभियानाच्या रूपाने अग्रेसर होत आहे.
या पुस्तकात सुचवलेला उपाय हा साधा-सोपा तर आहेच पण बिनखर्ची आहे. त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही वा महागडी उपकरणे किंवा विशिष्ट अशा आहाराचीही गरज नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणीही व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर हा उपाय अंगीकारू शकेल. रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी करणारा हा उपाय लठ्ठपणाबरोबरच आधी वर्णन केलेल्या जीवघेण्या रोगांच्या प्रतिबंधासाठीही उपयुक्त ठरेल. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा उपाय म्हणूनच बहुमूल्य असाच आहे. कै. डॉ. श्रीकांत जिचकारांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत शास्त्रोक्त विवेचनाद्वारे व समाजाप्रतीच्या तळमळीने हा उपाय व्याख्यानांद्वारे महाराष्ट्र व देशात पोहोचवला. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी डॉ. जिचकारांचा हा ज्ञानदीप पुस्तकरूपाने सर्व भारतीयांसमोर आणला आहे.
लेखकाविषयी... एम.बी.बी.एस., एम.डी. (पी.एस.एम.), पी.जी.डी.एच.ए., पी.जी.डी.एच.आर.एम., एफ.आय.एस.सी.डी. डॉ. जगन्नाथ दीक्षित सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबादच्या पी.एस.एम. विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 23 वर्षांपेक्षाही जास्त अध्यापनाचा अनुभव आहे. ‘इंडियन सोसायटी फॉर मलेरिया ऍण्ड अदर कम्युनिकेबल डिसीजेस’ने त्यांना फेलोशिप प्रदान केली आहे. आरोग्य शिक्षणातील योगदानाबद्दल त्यांना एक राष्ट्रीय व तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. शासकीय सेवेतील अत्युत्तम कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला आहे.
जगन्नाथ दीक्षित अविरत एकही पैसे ना घेता त्यांचे काम सुरु आहे. परंतु मला आस्चर्यचा धक्का बसला जेव्हा इतक्या मोठ्या मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पुस्तकावर कोणीच टिप्पणी दिलेली नाही.
मनापासून सांगतो कि हे डॉक्टर आधुनिक संत आहे. लठ्ठपणा सहज सोप्या पद्धतीने तेही १०० टक्के खात्रीने करावयाचा असेल तर हे पुस्तक आवश्यक आहे.
हजारो बोगस पुस्तक येतात आन जातात. परंतु हे पुस्तक शात्रीय आधारित १०० टक्के रिझल्ट देणार आहे, डॉक्टर चे २० हुन आधीक व्हाट्स अँप ग्रुप सुद्धा आहे जे विनामूल्य करते.
concept काय आहे ? तर दिवसातून फक्त दोन वेळा जेवणे मध्ये काही न खाणे ! आणि ५ किमी रोज चालणे. बाकी तुम्ही हे पुस्तक वाचा आणि स्वतःला लठ्ठपणा आणि अनेक आजारांपासून मुक्त करा.