Summary of the Book
उरलेल्या बिस्कीट चुरयाचे काय करावे?, व्हिनेगार घरी करू शकतो का?, साखरेचे कॅरामल म्हणजे काय, या आणि अशा प्रश्नांची उत्तरे हवी असतील, तर शेफ विष्णू मनोहर यांचे हे पुस्तक वाचावे. आधीच या पुस्तकात आणखीही बरेच काही आहे. स्वयंपाकात उपयोगी पडणार्या व आयुर्वेदिक महत्वाच्या टिप्स, रोजच्या वापरातील महत्वाचे मसाले व त्यांचे गुणधर्म या पुस्तकातून सांगितले आहे.
रोजच्या वापरातील काही भाज्या व त्यांचे गुणधर्म, रोजच्या वापरातील धान्य/कडधान्य, फळांचे काही प्रकार व त्यांचे गुणधर्म, स्वयंपाकघरातील स्वच्छतेविषयी काही माहिती अशा प्रकरणांमधून दैनंदिन गरजेची माहिती मिळते. विशेष म्हणजे वेगवेगळ्या खाद्दपदार्थांच्या विविध भाषेतील नावांचा तक्ताही पुस्तकात समाविष्ट आहे.