Summary of the Book
पुस्तकांच्या नावाप्रमाणे विजय पाडळकर यांनी सांगितलेल्या या छोट्या छोट्या कथा आहेत. कमी शब्दांत खूप काही सांगण्याचे त्यांचे कसब या कथांमधून दिसते.'काळजी' या कथेतला विरोधाभास स्पर्शून जातो. पैसा, मानमरातब पाहून मित्र भारावून गेलेला असतो. मात्र, त्यापाठीमागचे वास्तव त्याला माहित नसते.
'दृष्टीकोन एक' मधील इंद्रधनुष्य पाहण्याची दृष्टी किंवा 'फूल' मधील पारिजातकाच्या फुलांचे तरल, भावूक विश्व, 'कवी, झाड आणि कविता' माधिक वास्तव शेवट, 'सुख' माधिक फोमची गाडी, 'आस' या कथेतील संवेदनशील आविष्कार,' पुरस्कार' मधील आदर्श शिक्षकाचा खरा चेहरा,'आर्ट मधील क्षणात संपणारी आयुष्यभाराची घालमे अशा कितीतरी गोष्टी पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटत राहतात. काही कथा अचानक धक्का देतात आणि विचारप्रवृत्त करतात. ' परीक्षा,' मर्जी,''अरे देवा' या लगुत्तम कथा आहेत.