मोहंमद आली जिना हे अत्यंत यशस्वी बॅरिस्टर आणि राष्ट्रीय चळवळीतील उगवता देदीप्यमान तारा होते. रुबाबदार जिना यांचे अनेकांना आकर्षण होते. पण कोणालाही फारसे जवळ करीत; मात्र अत्यंत सुंदर व हुशार रट्टी पेटीट हिला पाहिल्यानंतर मात्र त्यांना तिची ओढ लागली. तीही त्यांच्या प्रेमात पडली.
अतिश्रीमंत पारशी बॅरोनेट दिनशा पेटीट यांची रट्टी ही कन्या होती. ती त्यावेळेस फक्त १६ वर्षांची होती आणि जिना ४० वर्षांचे असल्याने तिच्या पित्याने या सोयरिकीला मनाई केली. अठरावे वर्ष पूर्ण केल्यावर रट्टी जिनांबरोबर विवाहबद्ध झाली. समाजाने त्यांनी वाळीत टाकले. सहजासहजी भावना प्रकट न करणारे आणि भिडस्त स्वभावाचे जिना त्यांच्या अल्पवयीन पत्नीशी अत्यंत निष्ठेने, प्रेमाने वागत असत.
परंतु जसजशा वादळी राजकीय घटना जिना यांचे चित्त अधिकाधिक गुंतवून ठेवू लागल्या, तसतसा रट्टीचा एकटेपणा वाढू लागला. आपले कुटुंबीय, समाज यांपासून तोडली गेलेली रट्टी एकाकी पडली. अवघ्या एकोणतिसाव्या वर्षी ती मरण पावली. रट्टी आणि जिना यांच्या विवाहाचे शब्दचित्र शीला रेड्डी यांनी ‘मिस्टर अँड मिसेस जिना’मधून रेखाटले आहे.
‘मिस्टर अँड मिसेस जिना’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5140901936557622996