Summary of the Book
अन्तोन चेखव यांच्या मूळ रशियन कथांचा मराठी भावानुवाद.
सदाफुली सदा सतेज, सदैव नवी. चेखव यांची कथाही अशीच. ज्या काळात या कथा लिहिल्या गेल्या, तो काळ आता बराच मागं राहिलेला. त्यांतील संकल्पना, आदर्श आजच्या घडीला फारसे न मानवणारे. पण तरीही त्यांचा नर्मविनोद गुदगुल्या करत, चिमटे काढत सतत हसवत राहतो. भाषा, देश दुसरे असले, तरी काय झालं? `लहू का रंग एक है।‘ त्याप्रमाणे मनुष्यस्वभावाचे रंगही सारखेच. कोणतीही कथा उचलून वाचायला घ्या. कुठं ना कुठं ती व्यक्ती आपल्या परिचयाची वाटतेच. मग ते `समर्थाघरचे श्र्वान’ असो, `एका पामराची अखेर’, `जाडेराव आणि काडीराव’ असो किंवा `ती चंचला’ आणि `सदाफुली’ ही…