Summary of the Book
स्वयंपाक करण्यासाठी आवश्यक असलेले सारे काही एकत्र, असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. म्हणजे पूर्वतयारीपासून वेगवेगळ्या पदार्थांच्या कृतीपर्यंत वैविध्यपूर्ण घटकांचा पुस्तकात समावेश आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी या पुस्तकात स्वयंपाकासाठीची भांडी, स्वयंपाकाची पूर्वतयारी, अन्न शिजवताना घेण्याची काळजी आदींवर प्रारंभी मार्गदर्शन केले आहे.
मसाल्यांच्या कृती आहेतच शिवाय चहा, कॉफी सरबताचे प्रकार, मॉकटेल्स, दुधापासून तयार होणारे पदार्थ, पनीरचे पदार्थ शिकायला मिळतात. न्याहारीचे पदार्थ, उपवासाचे, चटण्या, ठेचा, लोणचे, कोशिंबिरी, पोळी, भाताचे प्रकार, आमटी, भाज्या, गोड पदार्थ, हॉटेलमधील भाज्या, बेकरीचे पदार्थ आदींच्या कृती दिल्या आहेत.