Summary of the Book
शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणारे राज ठाकरे यांचे झंझावात अल्प्वधीतच निष्प्रभ ठरले. खरेच असे झाले ? आणि झाले ते का झाले. या प्रश्नांचा वेध घेत एकूणच मनसेच्या कामाचा लेखाजोखा कीर्तीकुमार शिंदे यांनी या पुस्तकात मांडला आहे. मनसेने काही मुद्द्यांवर आंदोलने केली. उदा. मराठी माणसाची बाजू घेऊन फेरीवाल्यांविरोधात, परप्रांतियांविरोधात भूमिका घेतली.
गुजराती पाट्यंविरोधात भूमिका घेतली. गुजराती पाट्यंविरोधात आंदोलनात केले. या आंदोलनांना म्हणजे खळ्ळ- फॅटकलामराठी माणसांचा पाठींबा आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे. आरक्षण हे आर्थिक निकषांवर दिले जावे, अशी भूमिकाही राज यांनी घेतली आहे. मुंबईतील काही नागरी समस्यांवरही त्यांनी काम केले. मनसेच्या या आणि अशा कामाची नोंद पुस्तकात स्वतंत्र प्रकरणांमध्ये घेतली आहे. राज यांच्या भूमिकांमधील सुसंगती त्यातून सांगितली आहे.