साक्षात (भालचंद्र नेमाडे विशेषांक)
Arcticle Collection
Bhalchandra Nemade
Bhalchandra Nemade Visheshank
Editorial
Saakshata ( Bhalchandra Nemade Visheshaanka)
Sakshat
Sakshat ( Bhalchandra Nemade Visheshank)
Sakshat Prakashan
Sakshat: Bhalchandra Nemade Visheshank
Sampadit
Shashikant Deshmukh
भालचंद नेमाडे
भालचंद्र नेमाडे
शशिकांत देशमुख
सदरलेखन संग्रह
संपादित
साक्षात (भालचंद्र नेमाडेविशेषांक)
साक्षात : भालचंद्र नेमाडे विशेषांक
साक्षात प्रकाशन
साक्षात भालचंद्र नेमाडे विशेषांक
Pages: 96
Weight: 146 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
25% OFF
R 100
R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
भालचंद्र नेमाडे हे मराठी साहित्यातलं असं नाव आहे, जे टाळून पुढे जाताच येत नाही; मग ते टाळण्याची तुमची इच्छा असो वा नसो. त्यात नेमाडेंनी आपल्या 'बऱ्या-वाईट' साहित्यकर्तृत्वाने व्यापलेला अवकाश आहे, तब्बल ५० वर्षांचा. शिवाय १९६३ला त्यांची 'कोसला' ही पहिली कादंबरी प्रकाशित झाल्यावर साहित्य-विचारांचा धुरळा उडाला; तसाच तो २०१०मध्ये 'हिंदू' प्रकाशित झाल्यावरही उडतो. दरम्यान भरभक्कम कादंबऱ्यांचं चांगदेव चतुष्ट्य येऊन गेलेलंच असतं. बरं नेमाडेंनी कादंबऱ्याच लिहिल्या असं नाही, त्यांचे 'देखणी'-'मेलडी'सारखे कवितासंग्रहही नावाजले गेले. 'टीकास्वयंवर' हा समीक्षाग्रंथही गाजला. त्यापलीकडे 'देशीवाद'सारख्या साहित्यमूल्याची त्यांनी केलेली मांडणी अद्याप चचेर्चा विषय ठरलीय. एकूणात नेमाडे हे मराठी साहित्य-विश्वाततलं काहीतरी भयंकर प्रकरण आहे! साहजिक नेमाडेंच्या साहित्याची, साहित्यिक भूमिकेची साहित्यविश्वाला सतत दखल घेत राहावं लागलं आहे. फेब्रुवारीच्या ११-१२ तारखेला जळगावात नेमाडेंच्या साहित्यावर झालेली साधक-बाधक चर्चा, त्याचाच भाग होती. या चचेर्त अनेक मान्यवर लेखक-समीक्षक-वाचक सहभागी झाले होते. त्यापैकीच काहींनी लिहिलेले निबंध एकत्र करून औरंगाबादच्या 'साक्षात प्रकाशन'ने श्रीकांत देशमुखांच्या संपादकत्वाखाली 'भालचंद नेमाडे विशेषांक' प्रसिद्ध केला आहे.