Summary of the Book
लेखिकेने हिमालय आणि उत्तर भारतात केलेल्या विविध दौ-यातून त्यांना आलेले विविध अनुभव या पुस्तकात लिहिलेले आहेत. त्यांनी हिमालयाविषयी सरसकट माहिती न देता तेथील पर्वतरांगांनुसार पूर्व हिमालय (सिक्कीम, दार्जिलिंग), पश्चिम हिमालय (हिमाचल प्रदेश), मध्य हिमालय (कुमाऊँ, गढवाल, उत्तराखंड) आणि उत्तर हिमालय (जम्मू-काश्मीर) असे हे चार विभाग केले आहेत. प्रत्येक विभागाची आणि त्या त्या ठिकाणाची सविस्तर आणि व्यवस्थित माहिती दिल्याने भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, अशा सर्व दृष्टीने हिमालय आणि त्याचा भोवतालचा परिसर समजण्यास मदत होते.