Summary of the Book
डॉ. सुभाष म्हसकर हे सुविख्यात शल्यविशारद. प्रॅक्टिसमधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी वैद्यकीय विषयावरील लिखाणास प्रारंभ केला. डॉक्टर म्हसकरांचा अनुभव आणि ज्ञान यातूनच ‘इतिहास वैद्यकशास्त्राचा’ हा ग्रंथ निर्माण झाला. अत्यंत सोप्या मराठी भाषेत डॉक्टरांनी लेखन केले आहे. प्रस्तुत ग्रंथामध्ये भारतातील प्राचीन व अर्वाचीन वैद्यकशास्त्राची सर्वांगीण माहिती दिली आहे.