Summary of the Book
ग्रंथालयातील व ग्रंथवर्गीकरणासाठी जगभर मान्यता पावलेल्या ड्युई-डेसिमल क्लासिफिकेशन या पद्धतीचा वापर करणे जिकिरीचे होते. पण त्यावर मार्ग काढत मधुकर पांडुरंग संगवई यांनी मराठी पुस्तकांच्या वर्गीकरणासाठी ही सुटसुटीत सूची तयार केली आहे. ग्रंथपालन शास्त्राचा कोणताही कोर्स न केलेल्या व्यक्तीलाही या सूचीमुळे काम करणे सोपे जाणार आहे. या सूचीमुळे ग्रंथालय सेवकांचा वेळ वाचेल व या सूचीतील वर्गीकरण पद्धतीमुळे वाचकाला कमी वेळात बरीच पुस्तके मिळू शकतील. ग्रामीण भागातील वाचनालयांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे.