Anita
09 May 2019 12 23 PM
प्राजु खूप मस्त आहे पुस्तक ,तुझ्या आठवणी वाचता वाचता नकळत वाचक ही स्वतः च्या आठवणीत रमून जातो , खूप खूप धन्यवाद इतक्या छान छान आठवणींच्या खजिन्याचा नजराणा सर्वासमोर ठेवलास ,तुझ्या काचखड्यांची नक्षी खूप सूंदर रेखाटली आहेस ,ती आठवणींची नक्षी वाचून आपणही जमत नसताना दोन चार रेखोट्या ओढून जमेल तशी नक्षी काढावी का ?इतक्या छोट्या छोट्या प्रसंगातील छोटे छोटे अनुभव वाचताना आपल्या ही आयुष्यात असेच काहीतरी घडून गेले आहे , त्यावरची अलगतपणे धूळ झटकली जाते आणि लख्ख दिसू लागते ,आणि नकळत पापण्या ओलावतात , आपण इतक्या सहजपणे आयुष्याकडे पाहत असतो पण प्राजु ने छोट्या गोष्टीत किती आनंद शोधला हे जाणवते, बाळाचं आगमन असू दे की दवाखान्यात इमर्जन्सी असू दे ,किंवा केनेटिक मधले ऋतू असू देत ,प्रत्येक लेख परत परत वाचण्यासारखे आहेत , इतकी छान लेखिका, कवयित्री, गझलकारा , आपल्याला इतक्या वर्षांनी भेटली , आपली मैत्रीण होऊन सहजपणे आपल्यात मिसळली , खूप आनंद होतोय,कौतुक आहे 💕😍@Prajakta Patwardhan/ Gokhle