AarthshastraArthshastraBankingEconomicalEconomicsKashinath D. SalgarLog Var Adharit Calculationsअर्थशास्त्रकाशिनाथ डी. सलगरबँकिंगलॉग वर आधारित कॅल्क्युलेशन्स
विज्ञान शाखेसाठी 'लॉग'वर आधारित कैल्क्युलेशन्स'चे महत्त्व अनन्यसाधारण आहे.हा महत्त्वपूर्ण संदर्भ विचारात घेऊन हे ई-पुस्तक विकसित केले आहे. प्रस्तुत ई-पुस्तकाचे स्वरूप हे मुक्त शिक्षण प्रणालीतिल 'स्वयंअध्ययन साहित्य' अशा स्वरूपाचे आहे.त्या अनुषंगाने पुस्तकातिल आशयाची मांडणी 'क्रमोन्नत सोपान' अशा स्वरूपात आहे.पुस्तकाची भाषा खूपच सुलभ आहे.पुस्तकामध्ये आवश्यकतेनुसार उदाहरणांचा समावेश केला आहे. पुस्तकात एकूण ३प्रकरणांचा समावेश केला आहे.प्रकरण क्र.१मध्ये लॉग-ANTILOGची संकल्पना, संख्यांचे लक्षणांक, लॉग-ANTILOG सारणी मध्ये संख्यांचे लॉग- ANTILOG पाहाण्याबाबत सोदाहरण स्पष्टीकरण दिले आहे. प्रकरण क्र.२मध्ये लॉगच्या सहाय्याने संख्यांचे गुणाकार, भागाकार,घातांक आणि अन्य उदाहरणांची उकल सुलभ पद्धतीने करण्याबाबत सोदाहरण स्पष्टीकरण दिले आहे. सदरिल ई-पुस्तक ह्या लेखाची खूपच सुधारित विस्तारित आवृत्ती आहे.तेव्हा हे ई-पुस्तक विद्यार्थ्यांना खूपच उपयुक्त ठरणार आहे.