अकस्मात होणार होऊनि जाते
9789334066623 Akasmat Honar Houni Jate Akasmat Honar Houni Jate ! Aksmat Honar Houni Jate Anubhav Kathan Memories Prasad Godbole Shubhada Godbole अकस्मात होणार होऊनि जाते अकस्मात होणार होऊनि जाते ! अनुभव कथन प्रसाद गोडबोले शुभदा गोडबोले
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 350 R 263 / $ 3.37
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 32% OFF  R 350 R 239 / $ 14.00
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Urmila Pingle
05 Dec 2025 05 30 AM

*अकस्मात होणार होऊनि जाते* उचित शीर्षक असलेले व सुंदर मुखपृष्ठ लाभलेले शुभदा व प्रसाद गोडबोले लिखित हे पुस्तक अवचित हाती आले.. आणि त्याचे बहिरंग पाहूनच ते पुस्तक वाचण्याचा मोह आवरता आला नाही ... सुरवातीला दर्यावर्दी सिंदबादच्या अद्भुत आणि चमत्कारिक सफरी.. असं काहीसं पुस्तक असेल असे वाटले .. सुरुवातीच्या काही लेखांमध्ये ते जाणवले देखील .. कारण दर्यावर्दी जीवन हे आपल्यासाठी तसं नवीनच .. त्यामुळे या अनोख्या जगाचा परिचय आपल्या साठी खूप औत्सुक्यपूर्ण असतो .सागरांच्या लाटांवर हेलकावे खाणारी त्यांची जीवनशैली आणि त्यामुळेच असेल कदाचित भावनिक आंदोलनं देखील तेवढीच प्रत्ययकारी रित्या अनुभवाला येतात . त्यांच्या या हलत्या डुलत्या घराचे म्हणजेच बोटीचे तपशीलवार वर्णन प्रसादजींनी केले आहे .आपल्या आयुष्यातील उमेदीची तीन तपं बोटीवर व्यतीत केल्याने सगळे बारकावे त्यांनी अचूकपणे टिपले आहेत . त्यांचा सहकारी *जोसेफ* यांच्या विषयीचा अनुभव तर खूपच चित्तथरारक व हृदयद्रावक आहे . आणि त्याचवेळी बोटीवरील जीवनाची दाहकता दाखवून देणारा देखील आहे ... आपण चाचेगिरी विषयीच्या बातम्या ऐकतो ..वाचतो . पण असा *ऑंखो देखा हाल* वाचून ..जाणून घेण्याचा अनुभव हा काही आगळा वेगळाच म्हणावा लागेल ... या पुस्तकात समाविष्ट असलेले विविध लेख हे या दांपत्याच्या कौटुंबिक जीवनातील ठळक घटनांचा परामर्श घेणारे आहेत .. त्यामुळे त्यांच्या समुद्री विश्वातून बाहेर पडून आपण त्यांची कन्या *पुनवच्या हवाई विश्वात* जातो .. आणि मग त्या विश्वात पायलट विश्वातील एक वेगळाच कप्पा आपल्या समोर उघडला जातो . त्या अनुषंगाने मग बोईंग 37 मॅक्सचे देखील आपल्याला ठाऊक नसलेले छोटे मोठे तपशील समजतात ... पुस्तकात अधून मधून पेरलेल्या अनोख्या अशा विशेष स्कॅन व्यवस्थेमुळे पुस्तकाची रंगत अजूनच वाढते आणि वाचकाला पुस्तकाचे अंतरंग सखोलपणे जाणून घ्यायला मदत होते . विमानतळावर सामानाचे चेकिंग करताना स्पेलिंगच्या चुकीमुळे झालेला गडबड घोटाळा आपले मनोरंजन करुन जातो.. खरंतर तेव्हा ते किती त्रासदायक झाले असेल. पण कथन करताना मात्र विनोदाची डूब देऊन प्रसंग छान रंगवला आहे .. कुठलीही नवीन भाषा ..अगदी इंग्रजी भाषा शिकताना सुद्धा ऑक्सफर्ड स्पेलिंग ची मज्जा याचा सुंदर उहापोह केला आहे ... रस्त्यात गाठणारी भुतं.. अंधाऱ्या रस्त्यावरची लिफ्ट..या सर्व गोष्टी अनुभव कथनातील उत्कंठा वाढवतात .. तर देवाच्या दारात जाऊन पैशाचा व्यापार करणारे कलकत्त्याचे लालची पंड्ये.. यांच्या पार्श्वभूमीवर आपले काम हीच आपली देवपूजा मानणारा टॅक्सी ड्रायव्हर सरदारजी यांच्या प्रवृत्तीतून जीवनातील काळ्या पांढऱ्या रंगाचे दर्शन घडते .. घरी आलेल्या पाहुण्यांनी आपल्या घरातील पोर्ट्रेट पाहिल्यावर त्यांची विकेट घेताना लेखकाच्या मिश्किलीचे दर्शन घडते .. शुभदाने प्रिंटिंगच्या व्यवसायात आलेले आपले काही खास अनुभव कथन केले आहेत ..या दांपत्याने केवळ विचारातूनच नाही तर आपल्या आचरणातून जपलेली सामाजिक बांधिलकी खरंच अनुकरणीय आहे .. शुभदाने आपल्या सुपरमॅन श्वशुर *आप्पांचे* शब्दांकित केलेले व्यक्तीचित्रणही तेवढेच प्रभावी व प्रेरणादायी आहे .. जीवन त्यांना कळले हो या गटातील त्यांचे संपन्न असे व्यक्तिमत्व आहे .. थोडक्यात सांगायचे झाले तर. ..*अकस्मात होणार होऊनि जाते* हे पुस्तक म्हणजे गोडबोले दांपत्त्याच्या आयुष्यातील विविध क्षेत्रातील अनुभवांचा जणू कोलाजच आहे असे वाटते ..इत्यलम् ..🙏🏻 उर्मिला पिंगळे ( 9423056177) ०४ /०५/२०२५ 🚣🏻🚣🏻🚣🏻🚣🏻‍♀️🚣🏻‍♀️🚣🏻‍♀️🚣🏻‍♀️🚣🏻
Usha Mahajan
09 Mar 2024 05 30 AM

सप्तरंगात व नवरसात सजलेलं *अकस्मात होणारे होऊन जाते * हे प्रसाद-शुभदा जोडगोळीने मिळून लिहिलेलं पुस्तक वाचायला घेता क्षणी अशी काही पकड घेतं की मग सोडवतच नाही. अचंबित करणाऱ्या, उत्कंठा वाढवणार्या, तर मधेच भयप्रद घटना वाचताना व त्या ही खुसखुशीत, रसरशीत, चटकदार व चमचमीत भाषेच्या आवरणात सजलेल्या असताना साग्रसंगीत मेजवानीचा परमानंद प्राप्त होणं म्हणजे …केवळ अवर्णनीय !! प्रसादचा दर्यावर्दी कारकिर्दीचा गाढा अनुभव व जोडीला ज्ञानपिपासु वृत्ती त्यामुळे बोटी व विमानाबद्दलची सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे लीलया साध्य झालंय. Three cheers to Prasad……… शुभदाने नेहमीप्रमाणे तिच्या खुमासदार शैलीत तिला आलेले बोटीवरचे अनुभव व पुनवला तिच्या स्वप्नंपूर्तीसाठी दिलेला भरभक्कम पाठिंबा यावरती लिहिलेले लेखही छान वाचनीय. Appa the Great यांच्याबद्दल तर काय कितीही वाचलं, ऐकलं तरी कमीच आहे. मला भेटलेले एक आदर्श व्यक्तिमत्व 🙏🏽 असे हे हलकेफुलखे लेख असलेलं अफलातून पुस्तक या पावसाळी हवेत उबदार शाल पांघरून वाचण्याची मजाच और !! आवर्जून अनुभवून बघाच, सख्यांनो 📘
उषा महाजन
09 Feb 2024 05 30 AM

https://www.bookganga.com/R/8YY64 https://www.bookganga.com/R/8YY64
Chitra Vaidya
17/08/2024

शि. द. फडणीस शैलीतील हास्यचित्र, मनाच्या श्लोकातील वाटणारे शीर्षक आणि त्याखाली लिहिलेले ( इंग्रजाळलेल्या) खलाश्याच्या युनिफॉर्ममधील *पौपौय* आणि त्याची मराठमोळी *ओलीव* ह्यांचे *हटके अनुभव*( काखोटीत धरलेले इटूकले पिटूकले पुनवचे विमान दिसतेच) -----अशा भन्नाट त्रयींच्या कल्पकतेने सजलेल्या मुखपृष्ठावरच आपण भाळून जातो आणि पुस्तक वाचल्यावर तर त्याच्या प्रेमातच पडतो. प्रसाद आणि शुभदाचे अचाट, अनवट , अदभूत , अतरंगी अनुभव विश्व खरोखरच आपल्याला अचंबित करते ! हे पुस्तक मुख्यतः प्रसादच्या merchant navy मधील त्याच्या 35-40 वर्षाच्या नोकरीतील अनुभवांची शिदोरीआहे. दर्यावर्दी जीवनासंबंधी अतिशय माहितीपूर्ण , तरीदेखील हलके फुलके असे हे लेख आहेत. पानापानातून जाणवणारी( feel) गुढता, थरारकता , उत्कंठा शेवटपर्यंत आपल्याला ह्या पुस्तकात गुंतवून ठेवते.प्रसादचे हरहुन्नरी ,बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्व उलगडण्यात हे पुस्तक 100% यशस्वी झाले आहे.सोबत शुभदाचे नर्मविनोदी शैलीतील आणि वैमनिकाची करियर enjoy कर्णारया पुनवच्या अनुभववारचे लेखही मस्त आहेत. शेवटचा ' सुपरमैन ' आप्पांवरचा लेख तर लाजवाब ! संपूर्ण पुस्तकाला मिश्किलतेच्या दुलई त लपेटणारी खुमासदार, ओघवती भाषा --- ही तर ह्या पुस्तकाची खरी सुपर पॉवर! वाफाळणार्या कॉफीच्या घोटाबरोबर ह्या खुसखुशीत पुस्तकाची मजा नक्की अनुभवा! 👌👌👌👌 आणि हो, Q R कोडची आइडिया म्हणजे सोनेपे सुहागा!! *अकस्मात होणारे होऊन जाते* वर माझा अभिप्राय 👌👌👌👌👌👌
Purva Ghodke
15/08/2024

अकस्मात होणार होऊनी जाते! हे प्रसाद आणि शुभदा गोडबोले यांचं पुस्तक एकदम रोमांचक आणि प्रेरणादायी आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या साहसांची कहाणी सांगितली आहे, जिथे त्यांनी अनेक आव्हानं आणि धोकादायक परिस्थितींचा सामना केला. पुस्तकातील सर्व घटना खऱ्या आयुष्यातील आहेत, त्यामुळे वाचताना त्या अनुभवाशी आपण स्वतःला जोडून घेऊ शकतो. प्रसाद आणि शुभदा यांच्या प्रवासाने आपल्याला साहसाचं रोमांच तर दिलंच, पण संकटांच्या वेळी कसं टिकून राहायचं हेही शिकवलं. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण त्यांनी घेतलेली छायाचित्रं थेट पाहू शकतो, तेही फक्त QR कोड स्कॅन करून. भाषा सोपी आणि सहज समजणारी आहे, त्यामुळे कोणत्याही वाचकाला हे पुस्तक आवडेल. साहसाची आवड असलेल्यांसाठी आणि जीवनात नवे अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे. Stars - ⭐⭐⭐⭐/5
Manishas Affirmations
13/08/2024

या पुस्तकातील अमेरिकन नेव्हींनी लेखकाच्या बोटीवर हल्ला केला , तो अनुभव खूपच अद्भुत आहे . हा अनुभव वाचताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही . तसेच या पुस्तकाचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात योग्य ठिकाणी QR कोड दिले आहेत . ते स्कॅन करून आपण त्या क्षणाचे फोटो, व्हिडिओ आणि नकाशे बघू शकतो . यामुळे पुस्तक वाचताना अधिक मजा येते . शुभदा मॅडमची त्यांच्या मुली सोबतची पहिली फ्लाईट हा अनुभव खरच विलक्षण आणि अविस्मरणीय आहे . असेच अनेक चित्तथरारक, रोमांचक अनुभव या पुस्तकात छान पद्धतीने लिहिले आहेत . मला हे पुस्तक खरंच खूप आवडलं .
VAIBHAVI RAORANE POL
08 Oct 2024 05 30 AM

मुळात पारंपरिक नोकरी व्यवसाय यांच्या वाटेला न जाता केवळ वेगळी वाट नाही तर वेगळी बोट निवडून त्यातून जगभर प्रवास करून अनेकाविध चांगल्या वाईट अनुभवांनी समृद्ध झालेल्या व्यक्तीने त्या बद्दल लिहिणे म्हणजे तसे कसोटीचे काम. नेमके किती अनुभव निवडावे आणि कशा कशा बद्दल लिहावे?? प्रत्येक अनुभव शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आत्मिक पातळीवर परीक्षा पाहणारा. मात्र तरीही त्यातील निवडक अनुभव आपल्या खुमासदार शैलीत लेखकाने लिहिले आहेत. प्रत्येक प्रकरण वाचताना उत्कंठा वाढत जाते. त्यांच्या या प्रवासातल्या झालेल्या गमती जमती देखील लेखक आणि लेखिका यांनी अतिशय कल्पकतेने मांडल्या आहेत. पुस्तक संपवूनच बाजूला ठेवले जाते. तांत्रिक माहिती देखील पुरेशी असल्याने पुस्तक केवळ अनुभव कथन होत नाही तर ज्ञानातही भर घालते. लेखक द्वयीस मनःपूर्वक शुभेच्छा!!!
सुनेत्रा संजय तांबे
08 Aug 2024 05 30 AM

मुखपृष्ठ पासून ते शेवटच्या पाना पर्यंत खूप छान आहे पुस्तक .मर्चंट नेव्ही म्हटल की भरपूर पगाराची नोकरी एवढेच माहीत असते पण तिकडे काय काय अनुभवायला मिळते हे या पुस्तकात आहे .चारी बाजूने पाणी आणि वर आकाश यात राहणे सोपे नाहीये .खूप छान अनुभव कथन केले आहे .पुढे काय असे सतत वाटत राहते एकदा हाती घेतले की संपल्याशिवय सोडवत नाही .सगळ्यांनी आवश्य वाचणे .प्रिंटिंग चे फाँड् मोठा आहे त्यामुळे सिनियर सिटिझन लोकांनाही वाचताना त्रास होणार नाही .
Amala Padhye
28/07/2024

अप्रतिम अनुभव कथन क्षणा क्षणाला प्रत्येक गोष्टीत उत्कंठा वाढत जाते आणि वाचताना अतिशय मजा येते. सगळ्यांनी जरूर वाचावे असे पुस्तक श्री प्रसाद आणि सौ शुभदा गोडबोले यांनी आपल्या पुढे सादर केले आहे.
Manisha Gadhari
19/07/2024

Very nice book
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat