Summary of the Book
मनातील भावना उचंबळून येऊ लागल्या की, त्या शब्दांतून व्यक्त होतात. हे फुलणे म्हणजेच कविता होणे. मंजिरी निरगुडकर यांच्या कविताही 'मंदार आणि मंजिरीच्या कविता 'मधून फुलून आल्या आहेत.
उत्कट अनुभूती, अर्थपूर्ण शब्दांनी सजलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील या कवितांमधून वास्तव, स्वप्न, काल्पनिक, विषय डोकावतात. 'यही है वो दुनिया, जिसमें प्यार को नापा जाता है, रुपयों में और पैसों में खुशियों को तोला जाता है, ' असे जीवनातील वास्तव व्यक्त करीत असतानाच 'सळसळता वर सुटू लागतो भन्नाट, येता येता घेऊन येतो पाऊस माझ्या अंगणात, ' असे निसर्गावरील प्रेम त्या व्यक्त करतात.
'सुई - दोरा ' या गमतीदार कवितेतून त्यांच्यातील खेळकर स्वभावाची झलक दिसते. मंदार निरगुडकर हे आपल्या 'जे पाहिजे ते मिळत नसतं, मन सारखं रडत असतं, रडून काही होत नसतं, रडत रडत हसायचं असतं, ' यांसारख्या कवितेतून जगण्यातील सहजता सांगतात.
कलात्मकतेबरोबरच अध्यात्मिक प्रांतातही जे कवितेतून सहज व्यक्त होतात. या दोघांच्या कवितांमधून जीवनातील अनेक घटना, व्यक्ती, नाती यांचे पदर उलगडले आहे.