Summary of the Book
मनांगण हा कवयित्री माधुरी गयावळ यांचा पहिलाच काव्यसंग्रह त्यांच्या मनाच्या अंगणातील भावभावनांचा हा लोभसवाणा फेर आपल्याही मनात पिंगा घालतो हे या कवितेचे यश आहे. कवयित्रीच्या अंतर्मनाचा ठाव उचंबळून आल्यामुळे आपल्या मनाचा ठाव घेणारी ही कविता आहे. काटे सोडून फुले आणि अंधार सोडून उजेड पाहण्याची वृत्ती, प्रबळ आशावाद यांची अभिव्यक्ती करताना निसर्गप्रतिमांशी सहजतेने सांगड घातली आहे. कवयित्री चित्रकार आहे. ही कविता स्पंदनशील मनाच्या भाषेसोबत चित्रकाराचीही भाषा बोलते. साहित्य आणि कला यांचा सुरेख गोफ कवितेत विणलेला आहे. आईपणाची वात्सल्यरेघांची, भावनांचा परीघ ओलांडून खंबीरत्याच्या प्रदेशात पॉल टाकणाऱ्या स्त्रीमनाची, अनुभवांच्या आधारे आयुष्याचं गणित मांडणाऱ्या कविमनाची, जीवनविषयक उत्फुल्ल दृष्टीकोनाची स्पंदन म्हणजे ही कविता ! मनाची सल व्यक्त होतांना त्रागा नाही. हळुवारतेचा साज सांभाळताना जीवनदर्शनाचा बाज या कवितेने पेललेला असून हेच या कवितेचे सामर्थ्य आहे. परमेश्वराने कवयित्रीच्या मनात केली काव्याची रुजवण बहरात राहो ही सदिच्छा.... !