१९४७ हे वर्ष सुदैवी का दुर्दैवी या संबंधी मतभिन्नता संभवते. परंतु विशाल भारतीय उपखंडाच्या वाटचालीला त्या एका वर्षाने वेगळे वळण प्राप्त करून दिले. हे निर्विवाद.
विसाव्या शतकातले वर्णनविलक्षण वर्ष या[...]
केटरिंग कॉलेजचे विविध कोर्सेस केले. घरच्या घरी अनेक क्लासेस घेतले. गेली पंचवीस वर्षे वेगवेगळ्या पाककला स्पर्धांतून भाग घेऊन अनेक बक्षिसे व मानचिन्हे मिळाली आहेत. आता गेली दहा वर्षे पाककलेच्या परीक्षक [...]
‘‘माझ्यासारख्या कलावंताचं जीवन चाकोरीतलं नसतं. आम्हांला नीतिनियमांच्या बंधनात जखडून ठेवण्याचा लोकांना अधिकार नाही. कलावंताला मुक्त जीवनाचं स्वातंत्र्य हवंच. कलेच्या धुंदीत असणार्यांना अशा स्वातंत्र्य[...]
काका कालेकरांच्या मूळ 15 गुजराती पुस्तकांतून निवडलेल्या लेखांचा / उतार्याचा हा संग्रह आहे. काका कालेलकर हे सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत, लेखक व स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. त्यांची जन्मशताब्दी 1985 स[...]
नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं अधिकाधिक स्त्री-पुरुष अधिकाधिक प्रमाणात एकत्र येणार... त्यांचे मैत्रीचे संबंध वाढणार... कधीकधी भावनावेगाच्या भरात जमिनीवरनं पायही सुटणार...!
माणसाला भावना अससात, तशी स[...]
मराठीतील नव्या पिढीतील हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच जे व्यंगचित्रकार आहेत त्यात प्रशांत कुलकर्णी आघाडीवर आहेत हे निर्विवाद. भवतालच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीची किती अचूक जाण आणि भान त्यांच्याप[...]
महाराष्ट्रातील `अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनां’ना सव्वाशे वर्षांची दीर्घ परंपरा आहे.
कवी, लेखक, विचारवंत, संस्थानिक, इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ, भाषावैज्ञानिक, राजकीय नेते आदींनी संमेलनाचे अध्य[...]
सद्गुरु विश्वनाथमहाराज हे ज्ञानेश्वर-एकनाथ आदि संतांच्या तोडीचे संत. त्यांनी सुमारे 135 वर्षांपूर्वी हिमालयात जाऊन श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीगुरुगीता यात संक्षेपत: सांगितलेले गुह्य अध्यात्मज्ञान व स[...]
स्त्री कशी आहे? स्त्री कशी असेल?
पत्नी आणि माता या तिच्या महत्त्वाच्या भूमिकांकडे दुर्लक्ष न करता ती त्या समर्थपणे पार पाडेल पण त्याचबरोबर ती तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याची जपणूक करणारी असेल. ती स[...]
11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती आणि वॉशिंग्टनमधील अमेरिकन संरक्षण खात्याची (पेन्टॉगॉन) इमारत यांच्यावर दहशतवाद्यांनी विमाने आदळली आणि त्यामुळे अमेरिकेलाच नव्हे तर सर्[...]
शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारचे विशेष कौशल्याचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. परंतु या अभ्यासक्रमांची पुरेशी आणि योग्य माहिती सर्वच विद्यार्थ्यांना उपलब्ध होतच असे नाही. विशेषतः ग्रामीण भागामध्य[...]
प्रिय श्री. जावडेकर,
आपली 'आकांत' कादंबरी वाचली. मला तिचे लेखन आवडले हे कळवण्यासाठी हे पत्र. ही आपली पहिलीच कादंबरी असेल तर लेखनातला बांधीवपणा, शब्दांच्या काटकसरीतले सामर्थ्य, व्यक्तिरेखनाचे कसब, क[...]
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपल्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. नागरिक स्वातंत्र्याकरता आपण जो दुसरा संग्राम केला, त्याचे पुढारीपण जयप्रकाशजींकडे होते. पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे उद्दिष्ट[...]
‘‘ ‘अखेरचे आत्मचरित्र’ ही मराठीतील एक अनोखी कादंबरी आहे. फसवे नाव असलेली ही कादंबरी म्हणजे एका वठलेल्या म्हातार्याची हिरवी, चिरतरुण कहाणी आहे. तिचे स्वरूप आत्मचरित्राचे आहे पण आत्मा मात्र कादंबरीचा आ[...]
अरुण साधू हे पत्रकार आहेत तसे सरावलेले ललित लेखक आहेत. वाचकांना गुंतवण्याच्या क्लृप्त्या त्यांना अवगत आहेत. लेखनात रचनेचे वैविध्य कसे आणावे हे ते जाणतात. त्यांच्या या स्तंभलेखनात त्यांनी या गोष्टींचा[...]
ही कथा आहे आत्माराम वाडकर नावाच्या ध्येयवेड्या शिक्षकाची. तो मानवतावादी आहे; पण व्यवहारवादाचंही त्याचं भान भक्कम आहे. आत्मारामाच्या शिक्षक असलेल्या वडिलांनी बेचाळिसच्या बंडाने प्रेरित होऊन आपल्या आरे[...]
बालपणापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत पुण्यातील जे सांस्कृतिक जीवन सौ. निमकर यांनी पाहिले, अनुभवले त्याचा आलेख, त्याचे चित्र या पुस्तकातील लेखांतून उमटले आहे. ज्या सांस्कृतिक स्तरात लेखिका वाढली त्याच[...]
अंबा ! महर्षी व्यासांच्या लेखणीतून साकारलेली पण आजच्या स्त्रीमुक्ती आंदोलनाची जननीच वाटावी अशी एक महाभारतकालीन व्यक्तिरेखा. अनादी कालापासून चालत आलेल्या पुरुषप्रधान समाजरचनेविरुद्ध बंडाचे निशाण फडकवणा[...]
... असे अनेक तुकडेः निसर्गाचे, समूहाचे, व्यक्तींचे ते एकात एक मिसळून एक अमेरिकन आकाश तयार होत होते.
जो कष्ट करीत नाही, शिसत् पाळत नाही, त्याला या आकाशाखाली प्रतिष्ठा अथवा कसलेही समर्थन नाही. स्वातंत[...]
`अमेरिका व्हाया लंडन’ हे विलास खोले यांचे प्रवासवर्णन ही मराठीतील प्रवासवर्णनांत पडलेली एक चांगली भर आहे. लंडनमार्गे ते अमेरिकेला गेले. लंडनला राहिले. या मुक्कामावर आधारित `लंडन... एक धावती भेट’ हे प्[...]
या नाटकातील काही समस्या, त्या त्या माणसाच्या स्वभावामुळे, काही संस्कारामुळे, काही वृत्तींमुळे, काही आसपासच्या माणसांमुळे, वातावरणामुळे निर्माण झालेल्या दिसतात. कमी अधिक प्रमाणात, आपल्यालाही कुठे कुठे [...]
आधुनिक चीनबाबत सर्वांगीण माहिती देणारे `आम्ही पाहिलेला चीन’ हे मराठीतले पहिलेच पुस्तक आहे. आपल्या दौर्याची हकीकत सांगत असता लेखिकेने चीनची भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक इतिहास, भारताशी प्राचीन संबंध [...]
बेचाळीसच्या क्रांतीने प्रफुल्लदत्तांच्या प्रतिमेला विशेष गती मिळाली. तत्पूर्वी दोन वर्षे त्यांनी स्वयंप्रेरणेने अध्यापकाचा पेशा स्वीकारला होता. वाचनाचा व्यासंग आणि कवितेचा छंद यांनी त्यांच्या अध्यापन[...]
मुकुंद टाकसाळे हे आजच्या विनोदी लेखकांपैकी एक लोकप्रिय लेखक. त्यांचा विनोद आजच्या पिढीला अधिक जवळचा वाटतो. कारण तो निर्मळ तर आहेच, परंतु तो या पिढीच्या दैनंदिन जीवनातला आहे.
`रविवारच्या लोकसत्ते’म[...]
प्रत्येक सुखाचा स्यमंतक मणी असतो... तो मणी ज्याच्या-त्याच्या मस्तकावर विराजमान असतो. ज्याचा मणी चमकतो, तो सुखी !.... पण या मण्याची चोरीही होत असते... कुणी तरी हा मणीचोरतो आणि मणी नाहीसा झाला की, माणसं[...]
One must give Kudos to the playwrite Arvind Aundhe, who has written such a thundering script. One may presume that a top-class new dramatist has emerged here.
ज्ञानेश्वर नाडकर्णी (Afternoon)
अर[...]
प्रेमानंद गज्वी यांच्या एकांकिका समकालीन प्रश्र्नावर आधारलेल्या असल्या तरी त्या तपशीलात अडकून न पडता प्रश्र्नांच्या मूळाशी भिडतात. भाषेचे कमीत कमी अवडंबर ते करतात. काव्यगर्भ, सुभाषितवजा शैलीमुळे केवळ [...]