Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
अमृता - गुंजा- माया यांच्या रुपांतरातून आणि स्थानांतरातून एक अनोखं अनुभवविश्व आपल्यासमोर उभं राहतं.एखादा थरारपट आपल्यासमोर उलगडत जावा असं काहीतरी घडत जातं आणि या प्रवासात असे काही थांबे अवचित येतात जिथं या कादंबरीच्या निमित्तानं आयुष्याबद्दल आपण थोडा खोलात जाऊन विचार करायला लागतो. डाॅ.रोहिणी तुकदेव लिखित 'थांगपत्ता' कादंबरीचं हे मोठं यश आहे.
मानसी गानू
17/05/2021
थांगपत्ता ही कादंबरी विचलित मनोविभ्रमांचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून, नायिकेच्या रुपाने माणसाच्या एकूणच अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण करते. उगवत्या दिवसाचे स्वागत करताना नित्य नवी होत जाणारी नायिका आणि तिच्यासमोर येणारी नवी आव्हाने वाचकांची उत्सुकता वाढवतात. आवर्जून वाचावी अशी कादंबरी.
SHITAL MANE
17/05/2021
हरवलेल्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणंही जीवनाचा नवा अध्याय बनू शकतो .
थांगपत्ता अतिशय समर्पक शीर्षक . प्रत्येकानी नक्की एकदा तरी वाचावी अशी कादंबरी.
Onkar Thorat
17/05/2021
'विचलित मनोविभ्रमा'सारख्या (Dissociative Fugue ) विषयावर आधारलेली मराठी कादंबरीविश्वातील ही पहिली आणि महत्वाची कादंबरी आहे.अत्यंत वाचनीय असणारी ही कादंबरी स्त्रियांच्या असुरक्षित असण्याच्या प्रश्नापासून मानवी अस्तित्वाच्या मुलभूत विचारापर्यंत अनेक आशयसूत्रं आपल्या कवेत घेते.