राजा ओयदिपौस
8174865225 Anuvadit Deshpande Mauj Prakashan Mauj Prakashan Gruh Mouj Prakashan Mouj Prakashan Gruh Mouj Prakashan Gruha P L Deshpande P.L.Deshapande P.L.Deshpande Pu L Deshpande Pu La Pu La Deshpande Pu.La.Deshpande Pula Purushottam Laxman Deshpande Raja Aoyadipous Raja Aoydeepous Raja Aoydipous Raja Oedipus Raja Oydipaus Raja Oydipous Translated Translation अनुवादित देशपांडे पु ल पु ल देशपांडे पु. ल. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पुल पुलं पी एल पीएल मौज प्रकाशन गृह राजा ओयदिपौस
Not in Stock

 
Hard Copy Price: R 50 / $ 0.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
बंगाली रंगभूमीवरचे असामान्य प्रतिभेचे नट श्री. शंभू मित्र यांच्या ‘राजा ओयदिपौस’ या बंगाली नाटाकावरून मी हे मराठी नाटक लिहिले आहे. सॉफक्लीझच्या ह्या नाटकाची इंग्रजीतली निरनिराळी भाषांतरे त्यांनी वाचली होती. आणि त्यांच्या सुदैवाने कलकत्ता विद्यापिठात ग्रीक भाषा येणार्‍या प्राध्यापकांशी चर्चा करण्याची त्यांना संधी मिळाली होती. ह्या सर्व अभ्यासातून त्यांनी ‘राजा ओयदिपौस’ नाटकाची बंगालीत रंगावृत्ती तयार केली. ते पुस्तक १९६९च्या नव्हेंबरमध्ये छापून प्रसिध्द झाले आणि शंभुदांनी बंगाली रंगभूमीवर ‘बहुरूपी’ ह्या आपल्या नाट्यसंस्थेतर्फे ह्या नाटकाचे प्रयोग केले.

१९७५ साली पुण्याचा बालगंधर्व रंगमंदिरात शंभू मित्रांनी हा प्रयोग करुन दाखवला. एखादा नाट्यप्रयोग पाहताना देहभान हरपून जाणे म्हणजे काय याच अनुभव मी तो प्रयोग पाहताना घेतला. शंभू मित्रांनी तरुण ओयदिपौस इतक्या समर्थपणे उभा केला होता की त्या वेळी त्यांनी वयाची साठी गाठली आहे याचा प्रेक्षकांना यत्किंचितही संशय आला नाही. प्रेक्षागारात बंगाली न समजणार्‍या भरणा असूनही ओळीने सुमारे पावणेदोन तास सारे प्रेक्षागार एखादा अद्‍भुत चमत्कार पाहावा तसे हे नाटक पाहण्यात गुंतले होते. रात्री एकच्या सुमाराला झपाटल्यासारखा अवस्थेत मी घरी परत आलो आणि शंभुदांनी पाच वर्षांपूर्वी मला दिलेली बंगाली रंगावृत्तीची प्रत अथपासून इतिपर्यंत पुन्हा वाचून काढली. वाचताना शंभूदांचे संवाद कानात निनादत तसे. त्या नादातच मी ह्या रंगावृत्तीचा मराठी अनुवाद करायला घेतला. मूळ ग्रीक नाटकाची इंग्रजी भाषांतरे वाचून मी त्यांचा थोडाफार आधार घेतला असला तरी प्रस्तुत मराठी अनुवाद हा प्रामुख्याने शंभुदांच्या अनुवादावरून केलेला आहे. ह्यातला पात्रांच्या आणि स्थळांच्या नावांचा त्यांनी जो उच्चार स्वीकारला तोच मीही स्वीकारला आहे.

ओयदिपौस राजाचे नाव इंग्रजीत ‘ईडिपस’ असे घेतले जाते. इतरही नामोच्चरांत फरक आहे. पण शंभुदांनी मूळ ग्रीक उच्चारांचा जवळ जाणारे उच्चार स्वीकारले होते. त्यामुळे मलाही ते तसेच ठेवावे असे वाटले. फक्त शंभुदांनी अंध झालेला ओयदिपौस वाट चाचपडत निघतो इथे नाटक संपवले आहे. मला शेवटचा कोरस असावा असे वाटले म्हणून मी तो कोरस ठेवला आहे. ज्यांच्या अभिनयामुळे मला ह्या जागतिक वाङ्‍अमयातील असामान्य नाट्यकृतीचा मराठीत अनुवाद करण्याची प्रेरणा त्या शंभुदांना मी हे पुस्तक अर्पण करीत आहे.

~ पु.ल.देशपांडे
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat