Summary of the Book
वंजारी समाजासाठी काम करणारे उमाकांत वाघ यांचे अनुभव, त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त केलेले विचार, मतं यांचं हे संकलन. प्रतिकूलतेवर मात करतानाही त्यांनी उभा केलेला गोतावळा, सामाजिक चळवळीचा प्रवास, गोड-कडू अनुभव अशा सगळ्या गोष्टींवर त्यांनी प्रांजळपणे लिहिलं आहे. नाती हा त्यांच्या पुस्तकातला मोठा भाग आहे.
जीवन संघर्षाशी नातं, नात्यातलं मैत्र, परिवर्तनाचं नातं, रस्त्यांशी नातं, व्यक्तिगत नात्यांची सुख-दु-खं, नात्यांचं संचित अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी लिहिलं आहे. समाजकार्याशी नातं, सामाजिक एकी, वितुष्टाशी नातं अशा गोष्टींवरही त्यांनी विवेचन केलं आहे.