Manoj Gadnis
08 Jul 2017 01 26 PM
बहुतांशवेळा चाकोरीत जगणारी माणस स्वतःला मर्यादेची कुंपण घालून घेतात, मनाच्या शिवाराला घातलेली ही अदृष्य कुंपण ओलांडण्याचे भय साचत जातं किंवा परिस्थितीची अनुमती मिळत नाही. मात्र, तरीही काही अवलीयांना या कुंपणाचे नियमच मान्य नसतात. त्यातूनच ही माणस स्वतःच्या चाकोरीच्या कॅन्व्हासमध्ये अस्सल रंग भरतात. असे लोक जीवन समृद्धीच्या मार्गाचे साक्षीदार होतात. अशा माणसांना धुंडाळत त्यांच्या अंतरंगात डोकावत त्यांचं ''तसं असणं'' प्रभावी शब्दांच्या माध्यमातून मांडण्याचा एक वेगळा प्रयत्न ''शून्य प्रहर'' या पुस्तकाद्वारे केल्याचे दिसते. माणसं न्याहाळायची, अभ्यासायची...कारण चेहऱ्यामागे दडलेल्या मनाच्या खोल कप्प्यात अनेक भावनांचे तरंग त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वात विविध रंग भरत असतात. मुंबईनावाच्या रंगपटावर अन् दैनंदिन धावपळीच्या जीवनशैलीत तेच तेचपणाच्या रंगांच्या छटा या अधिक गडद होत जातात. निवांत क्षणी मेंदूत टिक-टिकणाऱ्या घडाळ्याच्या काट्यांना विश्रांती देत आणि मनाच्या कप्प्यात डोकावत, पाऱ्यासारख्या भासणाऱ्या क्षणांना बंदमुठीत घेणाऱ्या लोकांची जीवनासक्ती, प्रेरणा, आशा यांचा शोध घेण्याचे काम या पुस्तकाने केलंय. शुभेच्छा