Hard Copy Price:
25% OFF R 125R 94
/ $
1.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
अमेरिका एक जागतिक महासत्ता, बलाढ्य, संपन्न देश. जगात काहीही घडले, की लक्ष अमेरिकेकडे असते. बहुतेकांचे आकर्षण असलेली अमेरिका बहुरंगी, बहुढंगीही आहे. अशा अमेरिकेचे अंतरंग डॉ. मेधा गुप्ते-प्रधान यांनी ‘अनोखा अमेरिरंग’ या पुस्तकातून उलगडले आहेत. न्यूयॉर्क म्हणजे अमेरिका आणि अमेरिका म्हणजे न्यूयॉर्क अशी ठाम समजूत असते. असे होण्याचे कारण देताना या चिरतरुण नगरीचा इतिहास, भूगोल, तेथून सुरू झालेल्य अमेरिकेच्या भरभराटीबद्दल लेखिकेने सांगितले आहे. स्मोकी माउंटन राष्ट्रीय उद्यानाची सैर त्यांनी घडवली आहे. बहुरंगी दक्षिण अमेरिकेतील गुलामगिरी, स्वातंत्र्य, तेथील संगीताचा वारसा, श्वेत व कृष्णवर्णीयांचा संघर्षही त्यांनी मांडला आहे. दक्षिण टोक असलेल्या की वेस्टमधील निवांतपणा, त्या भूमीतील विविध क्षेत्रांतील दिग्गज, स्थानिक जीवन या गोष्टीही या पुस्तकातून जाणून घेता येतात. कधी काळी ‘वाइल्ड वाइल्ड वेस्ट’ म्हणून ओळखले जाणारे नेवाडा, कोलोरॅडो, कॅलिफोर्नियाचे रंग, अनोखे अलास्का, सप्तरंगी इंद्रधनूच्या कमानींचे हवाई बेट अशा विविध ठिकाणांची ओळख या पुस्तकातून लेखिकेने करून दिली आहे.
अमेरिकेचे विविध रंग फक्त उलगडुनच नव्हे तर त्यातील गडद तसेच फिक्या छटा दाखवणारे असे हे पुस्तक नावाला साजेसे अनोखे आहे. अतिशय बारकाईने टिपलेले हे अमेरिकेचे रुप वाचताना जण काही आपण तिथेच आहोत याची प्रचीती आली. पुस्तकातील चित्रे अजुनच रंगत वाढवतात. अमेरिकेला जाउन आलेल्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद हे पुस्तक देइल आणि अमेरिकेत जायचे बेत आखणारऱ्यांना हे नक्कीच उपयुक्त ठरेल.