Summary of the Book
खिळवून ठेवणारी थरारकथा
वैज्ञानिक कथा वा कादंबऱ्या या प्रामुख्याने काल्पनिकच असतात. परंतु त्या कथाबीजाला वास्तवतेची झालर लावण्यात लेखक यशस्वी झाला तर अनोखी कथा तयार होऊ शकते हे रोहिणी निलेकणी यांच्या 'स्टिलबॉर्न'ने दाखवून दिलंय. मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद श्रावण मोडक यांनी परिणामकारकरित्या केला आहे. स्त्रियांसाठी संततीप्रतिबंधक लस तयार करण्याच्या जागतिक स्पधेर्त एका भारतीय शास्त्रज्ञासमोर सुवर्णसंधी येते.
त्यानं तयार केलेल्या लशीची चाचणी आदिवासी महिलांवर केली जाते. पण लस दिलेल्या या स्त्रियांना प्रत्यक्षात बाळ होतं आणि तेही मृत आणि विदुप. यामागच्या कारणांचा शोध एक महिला शोधपत्रकार कसा घेते, त्यातून जे आढळतं ते म्हणजे ही कादंबरी. औषधनिमिर्तीच्या क्षेत्रातील देशी तसेच जागतिक स्पर्धा, राजकारण, वातावरण लेखिकेने नेमके टिपले आहे. तसेच आदिवासींच्या जगाचं अनोखं दर्शनही निलेकणी यांनी घडवलंय. एका वेगळ्या जगाचा अनुभव देणारी 'स्टिलबॉर्न' वाचकाला खिळवून ठेवते.