Summary of the Book
शास्त्रीय संगीत ही रियाझाने शिकण्याची कला आहे. असे असले तरी ज्ञानप्राप्तीसाठी, संग्रही ठेवण्यासाठी पुस्तकाचा वापरही केला जातो. "रागब्रह्म' हे शास्त्रीय संगीतावर आधारित पुस्तक आहे. सुलोचना कुलकर्णी यांनी हे संकलित केले आहे. पुस्तक तीन भागांत विभागलेले आहे.
पहिल्या भागात प्रत्येक रागाची आवश्यक माहिती, बडा ख्याल, छोटा ख्याल, त्यांची नोटेशन्स, ताना इत्यादी आहे. दुसऱ्या भागात काही रागांची फक्त ओळख करून दिलेली आहे. तिसऱ्या भागात धृपद, धमार, ठुमरी, तराणा, भिवट आणि ताल यांची उपयुक्त माहिती दिली आहे. संगीताचे शिक्षण घेणाऱ्या सर्वांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकते.