Summary of the Book
समाजासाठी , विश्वासाठी आपल्या संतांनी , ऋषीमुनींनी अथक संशोधन करून तपश्चर्येने अध्यात्म प्रकट केलं . या ऋषीमुनींचा आढावा ' चार शब्द ' या दिवाळी अंकात घेण्यात आला आहे . डॉ . यशवंत पाठकांनी धर्म , अर्थ , काम आणि मोक्षाविषयी लेख लिहला आहे . तर स्त्रीशक्तीचे जागृत स्फुल्लिंग समाजात केवढा विधायक चमत्कार घडवू शकतात हे डॉ . विजया वाड यांनी आपल्या ' ताई ' या कथेतून मांडले आहे . परमार्थ कराल तर तो डोळसपणे करा , सोवळ्या ओवळ्याचं प्रस्थ माजवू नका , देव - देव्हारे वाढून नका ही स्वामी समर्थांची शिकवण माधवी दणी यांनी आपल्या लेखात मांडली आहे .