Summary of the Book
'कोर्टाची पायरी चढू नये' असे म्हणतात; पण एकदा पायरी चढल्यावर वादी-प्रतिवादींना
अनेक अनुभव येतात. साक्ष-पुरावे यांच्या जंजाळात न्यायालयात खटले वर्षनुवर्षे चालतात.
दिवाणी खटल्यांमध्ये अनेक तापदायक अनुभवांना सामोरे जावे लागते. एक वकील म्हणून
अॅड. रेणू देव यांनी खटले लढताना आलेले व्यावसायिक अनुभव 'देवाशपथ खरं सांगेन'
मध्ये दिले आहेत. वादी-प्रतिवादींच्या बाजूने मांडलेल्या खटल्यांची वस्तुस्थिती यात आहे.
प्रत्येक खटल्यांचे वास्तव स्वरूप, घडलेल्या घटना, व्यक्तींचे वागणे यात उतरले आहे.
सहज, सोपी, वास्तववादी शैलीमुळे वाचकांचे कुतूहल व उत्सुकता कायम राहते.