Summary of the Book
जगातील अनेक घटकांपुढे नानाविध समस्या असतात. यात प्रामुख्याने महिला, कामगार, बालक, पालक, अपंग, वृद्ध यांना भेडसावणारे प्रश्न असतात. ते जाणून घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे थोडेच असतात.
लीला आवटे यांनी या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. शिक्षक म्हणून समाजात वावरताना त्यांनी विविध विषयांत स्वतःला गुंतवून घेतले. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ त्यांनी समाजसेवेसाठी दिला. सामाजिक उणिवांवर लक्ष वेधून त्यावर त्यांनी लेखन केले.
‘जाग मना, जाग’मध्ये ते संग्रहित केले आहे. समाजातील ज्या वर्गावर अन्याय होत असेल त्याच्या मुळाशी त्या गेल्या. अन्याय थांबविण्यासाठी त्यावर पर्याय सुचविले. प्रसंगी परखड भाष्य करून समाजातील लोकांची बोथट झालेली मने जागविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.