Summary of the Book
श्रीमुकुंदराज हे शिवभक्त आणि नाथपंथी होते. त्यांनी पारंपारिक पद्धतीने वेद, उपनिषदे, पुराणे, दर्शने आणि अन्य ग्रंथांचे अध्ययन पूर्ण केले. मुकुंदराजांनी विवेकसिंधुत अद्वैत-सिद्धांतांचे प्रतिपादन केले आहे.'शंकरोक्तीवारी | मियां बोलिली हे वैखरी |' असे त्यांनी म्हटले आहे. 'इथे ग्रंथीचें हेंचि चातुर्य | जें रोकडें स्वानुभवसौंदर्य |'
अशांसाठी मराठी भाषेत ग्रंथ रचण्याची युक्ती आपण केली असल्याचे ते मोठ्या गौरवाने सांगतात. स्वानुभवाच्या बळावर, अद्वैतसारखा गहन विषय, मराठी भाषेत प्रथमच लिहून त्यांनी ती लोकप्रियता आणि तो आदर सार्थपणे मिळविला आहे .