Summary of the Book
भ्रमंतीची, तीही सायकलवरून फिरण्याची आवड जोपासत चक्क जगभ्रमंती करण्याची कल्पना काहींच्या मते धाडसी तर काहींच्या मते वेडगळपणा ठरणारी. मात्र ४३ महिने कष्ट घेऊन काटेकोर नियोजन करीत सायकलप्रेमी 'वर्ल्ड टूर' करून आले. त्यात नियोजनापासून महत्वाची भूमिका बजावणारे होते सतीश अर्जुन आंबेकर. त्यांच्याबरोबर होते महेंद्रकुमार, आर. पी. मंडल आणि मख्खनसिंगत्यां च्या ३२० दिवसांच्या अनोख्या सायकल सफरीचा वृत्तांत सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी 'दोन चाकं झपाटलेली'त कथन केला आहे.
मुंबई, कोलकाता, मार्गे पुढे बँकॉक, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, हॉलंड, बेल्जियम, फ्रान्स, स्पेन, मोनॅको, इटली, व्हॅटिकन सिटी, पूर्व व पश्चिम जर्मनी, स्वित्झर्लंड, झेकोस्लोव्हाकिया, ऑस्ट्रिया, हंगेरी, युगोस्लाव्हाकिया, तुर्कस्तान, बल्गेरिया आदी२४ देशांमधून भारतात परत असा हा प्रवास झाला. या काळात विविध देश, त्यांचे वैशिष्ट्ये, तेथील नागरिक, अधिकारी, व्यावसायिक, आदींचे अनुभव, पर्यटन, संस्कृती, सायकलप्रवासाबाबत उत्सुकता, त्यात आलेल्या अडचणी व त्यावर मात करीत फत्ते केलेली मोहीम यांचे रोमांचकारी वर्णन यात आहे..