Summary of the Book
बऱ्याचदा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाणे शक्य होत नाही. अशा वेळी अनेक मोठी हॉस्पिटल किंवा फॅमिली डॉक्टरही होम केअर सेवा उपलब्ध करून देतात. होम केअर म्हणजे नेमके काय, त्याची गरज का असते आदी मुद्यांवर पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
डॉ. संजय बजाज यांनी होम केअर या विषयाची सविस्तर चर्चा या पुस्तकात केली आहे. त्याचबरोबर निरोगी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
हृदय, पायातील रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह, व्हिटामिन डी - थ्री चा अभाव, ऑस्टोओपोरोसिस आणि व्यायाम, वातव्याधी, न्यूमोनिया, झोपेचे महत्त्व, वृद्धांचे विशिष्ट आजार, किडनी, मेंदू, डिमेंन्शिया आदींचे ओळख ते करून देतात.
डॉक्टर आणि रुग्णांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरावे.