आपल्या प्रत्येकाच्या घरात खास महाराष्ट्रीयन पद्धतीचे पदार्थ रोजच्या आहारात असतात. साधेच पण चविष्ट पदार्थ खाल्ले की मन तृप्त होते. शाकाहारी जेवणातील मराठमोळ्या चवदार पदार्थांच्या कृती माधुरी घाटपांडे यांनी ‘पारंपरिक व्हेज ट्रीट’मधून दिल्या आहेत.
न्याहरीच्या पदार्थांमध्ये पोह्यांचे विविध प्रकार, सांजा, शिरा, विविध प्रकारे केलेला उपमा, थालीपीठ असे ८६ पदार्थ यात आहेत. भात, भाज्या, सुक्या पालेभाज्या, पातळ भाज्या, आमटीचे निवडक पदार्थ, कढी, पिठले, सार, सांबार, उसळी, चटण्या, कोशिंबीर, रायते, भरीत, लोणची, गोडाचे पदार्थ अशा सुमारे ४३० खमंग पदार्थांच्या कृती यात आहेत.
शिवाय दिवाळीच्या फराळातील पदार्थांचा खास विभागही आहे. पदार्थांची चव ही त्यातील मसाल्यांवर अवलंबून असते. म्हणूनच, पारंपरिक मसाले कसे तयार करायचे, हे यात सांगितले आहे. सणवार किंवा धार्मिक काळात खास स्वयंपाक घरोघरी केला जातो. त्या वेळी ताटात कोणते पदार्थ असावेत, याबद्दल आणि श्रावणातील पदार्थांची यादीही यात आहे. जोडीला पदार्थांसंबंधी टीपही दिल्या आहेत.
‘पारंपरिक व्हेज ट्रीट’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5598728085065956275