Summary of the Book
भारतात वेगवेगळ्या प्रांतातील खाद्यपदार्थ म्हणजे तेथील संस्कृतीचे प्रतीक असते. महाराष्ट्रीय, दाक्षिणात्य, पंजाबी पदार्थांची स्वतःची खासियत असते. त्या सारस्वती पदार्थ म्हटले की तांदूळ, नारळ, गुळ, यांचा वापर करून केला जाणारा स्वयंपाक अशी ओळख आहे. अशा पद्धतीच्या पदार्थांच्या पाकक्रुती शालिनी नाडकर्णी यांनी सारस्वत स्वयंपाक मधून दिल्या आहे.
प्रथम सरस्वती मसाले कसे बनवायचे हे सांगून पुढे लोणचे, चटण्या, पापड सांडग्यामध्ये अख्ख्या आंब्याचे लोणचे, आल्याची चटणी, फुटण्याच्या मिरच्या, अननसाचे सासव, काजू-तोंडली उपकारी, रायतं, किसमूर, भरतीचे प्रकार, दुपारच्या खाण्यात तिखट रवा इडली, बिस्किट रोटी, कोबीचे वडे, कालवलेले पोहे, कडधान्यांच्या प्रकारात कुथळाचं कोदेल, काळ्या वाटण्याची आमटी, मसुराची आमटी, बटाट्याचे पदार्थ, भाज्यांमध्ये खदखद, कंदमूळ, तोंडल्याची तळसणी, पालेभाज्या, आमटीचे प्रकार, थंड कढी-सार, गोड पदार्थ यात आहे.
सारस्वत आणि माशांचे नाते जन्मोजन्मीचे म्हणता येईल. त्यामुळेच बांगडा, पापलेट, कोळंबी तिसऱ्या व अन्य माशांचे विविध पदार्थ यात आहे. ३५०हून अधिक शाकाहारी व मांसाहारी स्वादिष्ट सारस्वती पाककृती सांगितल्या आहेत.