Summary of the Book
मातृत्व ही स्त्रीच्या जीवनातील आनंदाची गोष्ट असते. कुटुंबातही यामुळे आनंद, प्रेमभावना दृढ होते. हल्ली स्त्री नोकरी - व्यवसायात गुंतलेली असते. तसेच विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मातृत्व, गर्भारपण, त्या काळात घ्यावयाची काळजी असे अनेक विषयांवर मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते.
हे काम डॉ. सौ. दीपाली पाटील यांनी 'सुखद मातृत्व' या पुस्तकाद्वारे केले आहे. विवाहपूर्व वैद्यकीय समुपदेशन आवश्यक का असते, हे सांगताना त्यांनी अनेक गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. गर्भधरणा कशी होते हे स्पष्ट करताना वंध्यत्व, त्यावरील उपाय दिले आहेत.