Summary of the Book
नक्षत्र हि माणसाची नियती आहे, असे ज्योतिषशास्त्र मानले जाते. असे मानूनच काही आडाखे बांधले जातात. प्रा. क्षितीज पाटुकले यांनी या पुस्तकात ज्योतिष, नक्षत्र आणि नक्षत्रवृक्ष यांचा संबंध जोडणारी प्राथमिक स्वरुपाची माहिती दिली आहे. ही माहिती वैयक्तिक अनुभव आणि प्राचीन ग्रंथांमधील माहितीवर आधारित आहे, असे ते सांगतात.
मानवी प्रयत्नांना नक्षत्रवृक्षांच्या उपासनेमुळे निसर्ग, वृक्ष, ग्रह, नदी, पंचमहाभूते यांची मदत मिळून निखळ शांती आणि आनंद मिळावा, असा त्यांचा हेतू आहे. पुस्तकात ते नक्षत्रवृक्ष विज्ञान आणि पर्यावरण, नक्षत्रवृक्ष शोधण्याची पद्धती यांची माहिती देतात; तसेच नक्षत्रवृक्ष शोधण्याच्या पद्धतीही सांगतात. नक्षत्रे, नक्षत्रवृक्षांचा परिचय व उपासना असे विस्तृत प्रकरण आहे. ग्रह व ग्रहवृक्षांसंबंधातही समजते.