Summary of the Book
कथा ऐकायला लहानमोठ्या सर्वांनाच आवडते. जगात प्राचीन काळापासून कथा अस्तित्वात आहे. इसापनीती, अरेबियन नाईट्समधून कथांचा परिचय होऊ लागला, मानवी जीवनातील विसंगती कथेतून सहज सांगणार्या इसापच्या कथांमधून तात्पर्य, बोध कळतो. त्याच्या कथांमधून प्राणिजगतही डोकावते. त्यामुळे या कथा सर्वांनाच आवडतात. त्यातून कथेचे सामर्थ्य लक्षात येते. कथांचे बाजही वेगवेगळे आहेत. अद्भुत, वास्तव, परीकथा, लोककथा, पुराणकथा, भयकथा अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये माणूस रमतो. या कथांचा अभ्यास करून तो रेणू गावस्कर यांनी ‘गोष्टी जन्मांतरीच्या’मधून कथाकथनाच्या रूपात मांडला आहे. सोपे, रसाळ व संवादी लेखन यामुळे त्यांच्या गोष्टी मनाला स्पर्शून जातात