Summary of the Book
भाली चंद्र असे धरिला !!!
शब्दांचा अचूक वेध घेत सुरांची लखलखती वीज दीनानाथांच्या रूपाने नाट्य-अवकाशाला भेटून गेली.साधारणत: शतकभरापूर्वी घडलेली ही घटना. पुढे दिमाखाने झळाळणारं "दीनानाथ पर्व" संपलं, मात्र, तत्पूर्वी आपल्या भाळी धारण केलेला स्वरचंद्र दीनानाथांनी रसिकजनांच्या ओटीत घातला. या तेजस्वी चंद्राच्या पाचही कलांनी पुढे रसिकमनांवर अभिजात स्वरांचं अलौकिक शिंपण घातलं. त्याच चंद्रकलांमधून पूर्णत्वाला आलेलं स्वररूप म्हणजे ... "लता" मर्त्य मानव विज्ञानाची कास धरून चंद्रावर जाईल तेव्हा जाईल ... मात्र, सर्वसामान्य माणूस 'लता' नामक चंद्राच्या शीतल स्वरवर्षावात वर्षानुवर्षे भिजत आलाय !!! जगभरातील प्रत्येक गानवेड्या रसिकाने 'लता' नावाचा स्वरांचा 'पूर्णचंद्र' आपल्या 'हृदयात' धारण केलाय ...