Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Summary of the Book
... आणि मग चाळीशी जवळ आलेल्या ह्या 'नवीन' पिढीला जेव्हा स्थैर्याची गरज भासू लागते तेव्हा त्यांचे पगार इतके वाढलेले असतात की संस्थेकरता ते फार महागडे झालेले असतात. इतर संस्थाही त्यांना एवढा पगार देऊ शकत नाहीत. अवास्तव पगारामुळे महागड्या सवयी लागलेल्या असतात. मोठी वाहनं, वाहनचालक, विमानप्रवास, परदेशी सहली, मोठमोठ्या क्लब्समध्ये सभासदत्व, महागड्या शाळा, कपडे, दागिने, घरं. मन आणि शरीर तडजोडीला तयार नसतं. स्वतःच्या अहंभावाशी तडजोड केली तरी घरच्यांच्या अपेक्षांचं ओझं उतरवता येत नाही. आणि मग सुरु होते एक जीवघेणी धडपड ...
आजच्या युगातील 'कर्मयोग्याची' वाटचाल व त्याच्या अवतीभवती घटणाऱ्या घटनांमधील गुंफण, कथेची उत्कंठा अगदी चढत्या क्रमाने वाढवत ठेवण्यात संदीप यशस्वी झाला आहेस. 'मुक्त' कादंबरीचा विषय व त्याची मांडणी मनाला भावून गेली. अप्रतिम पुस्तक !
मीरा भारती
02 Feb 2011 01 17 PM
संदीप फारच सुंदर. मला हि कादंबरी खूप आवडली. आमचीच गोष्ट वाटली. शुन्यातून विश्व उभ्या करणाऱ्या मध्यमवर्गीय हुशार माणसाची कथा आणि व्यथा तू अचूक मंडळी आहेस. आपल्या पिढीतले, जे घरच्यांचे आर्थिक पाठबळ नसतांना नुसत्या हुशारीवर वर आले त्यांची हि गोष्ट आहे. ती मला खूप भावली.
संदीप RANE
23 Jan 2011 02 25 PM
संदीप खूप दिवसांनी एक चांगले पुस्तक वाचायला मिळाले , तुच्या पुस्तकात आत्ताच्या पिढीची व्यथा मिळते आपण कामाच्या ओघात वाहून जातो आणि मग त्याच गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरू लागतात . स्वताला स्वताच्या साच्या मेढे ठेवणे अवघड होत आणि मग आपणच आपल्या शी प्रत्राना करू लागतो . पुस्तक वाचताना मला स्वताच्यी स्टोरी वाचतोय आहे वाटतंय .
मी एकाच शब्दात तुच्या पुस्तका विषयी बोलेन - खूप सुंदर . तुच्यात्ला लपलेला कलाकार बाहेर आला
संदीप राणे Mumbai
K D
09 Jan 2011 09 48 PM
हे पुस्तक नक्की वाचा.
शयनी देसाई
08 Jan 2011 07 22 PM
गुड स्टोरी. असे वाटले कि आपल्याच आयुष्याचा किस्सा आहे. उर्वरित भाग वाचायला नक्की आवडेल