Summary of the Book
भारतीय लोकसंख्येत पंधरा टक्के म्हणजे सोळा कोटी लोकसंख्या असलेला भटक्या-विमुक्तांचा हा समाज स्वातंत्र्यानंतरही अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वीज आणि सन्मान यापासून दूर असल्याचे सरकारी आकडे सांगत आहेत. हे असे का-कसे घडले? या समूहाचा इतिहास काय आहे? यांच्या जगण्याची साधने कोणती होती-आहेत ? ती कोणी-का हिसकावून घेतली ? यांना परिघाबाहेर कोणी ढकलले ? याला भटक्या-विमुक्त जनतेने विरोध केला का ? या विरोधाची शास्त्रे -शस्त्रे कशी होती ? त्यासाठी त्यांच्या पूर्वसुरींची कोणते तत्वज्ञाने वापरली ? यांच्या अभिव्यक्तीची माध्यमे कोणती ? यांच्या विषयीच्या अभ्यासाच्या पद्धती कोणत्या असू शकतील ? कसे जीवन जगत आहे हा समूह ? या समज समूहाच्या स्थिती-गतीचा आणि यशापयशाचा लेखाजोखा काय राहिला ? यांच्यावरील झालेले संशोधन कशा प्रकारे आहे ? याविषयक हितसंबंधांचा सखोल, मुलग्रामी विचार करण्यासाठी मुंबई विध्यापिठाच्या फुले-आंबेडकर अध्यासाकाने अभ्यासकांना लिहिते केले.
भटके-विमुक्त जाती-जमाती: संकल्पना, इतिहास आणि तत्वज्ञान, भटके -विमुक्त जाती जमातीची वैशिष्ठ्ये, पितृसत्ताक जातपंचायत वास्तव आणि आव्हाने कला-स्थापत्या सांस्कृतिक संदर्भ, जमातीच्या लोककला, भाषा आणि त्याचे नवे संदर्भ, सेटलमेंट अभ्यास, विविध आयोगाचा अभ्यास व त्याची अंमलबजावणीतील अडथळे, बंधमुक्तीच्या सामाजिक चळवळी, शिक्षण, जाती अत्याचार अशा मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक असल्याने, तसेच बदलता सांस्कृतिक परीघ आणि विचारव्यूह लक्षात घेऊन भटक्या -विमुक्त समुदायापुढील आव्हाने अधोरेखित करून त्याला सामोरे जाण्याची संरचना आणि शक्यता कोणती असेल याच अनुबंध तपासण्याचा प्रयत्न म्हणजे प्रस्तुतचे संपादित पुस्तक होय.