आईची देणगी
Pages: 227
Weight: 409 Gm
Binding: Paperback

Not in Stock

 
Hard Copy Price: R 400 / $ 5.71
25.00% OFF  R 300
20.00% OFF  R 320
15.00% OFF  R 340
10.00% OFF  R 360
 
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
गो. नी. दांडेकर यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेल्या या संस्कारकथा. लहान मुला-मुलींबरोबरच मोठ्यांनीही वाचाव्यात अशा. आईने मुलाला सांगाव्यात किंवा वाचून दाखवाव्यात अशा. आपल्या देशात राम, कृष्णाबरोबरच शिवरायांसारखे पराक्रमी राजे, तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्यासारखे संत, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे थोर सेनानी होऊन गेले. या थोर व्यक्तींच्या गोष्टी गो. नी. दांडेकर यांनी रसाळ, ओघवत्या भाषेत सांगितल्या आहेत. या एकूण ४२ कथांमध्ये साहस, पराक्रम, धैर्य, उदात्तता, चातुर्यम गुरुभक्ती, मातृ-पितृभक्ती, कर्तव्यपरायणता आदी गुणांचा समुच्चय दिसून येतो. सुबोध, सुलभ भाषा हे या काथांचं वैशिष्ट्य. हा उपदेश नाही, तर संवाद आहे. बोधप्रद प्रेरणा देणाऱ्या या कथा मोठ्यांनाही गुंतवून ठेवतात.
Book Review
Write a review

माधवी वाघ
08 Jun 2018 05 30 AM

सर्वोत्कृष्ट पुस्तके ..!! लहानपणी मला माझ्या आईने ही पुस्तकं वाचायला दिली, त्याकाळी ८ भाग वेगवेगळे होते. पण त्यातली गोनीदांची भाषा मला इतकी आवडली की मी दिवस रात्र मी पुस्तकं वाचतच राहायचे. प्रेमात पडले वाचनाच्या ! गोनीदा माझे आवडते लेखक झाले. अतिशय परिणामकारक आणि तरीही सोपी रसाळ अशी गोनीदांची भाषा.. अगदी प्रेमळ आजोबा बाजूला बसून नातवंडांना गोष्ट सांगत आहेत असाच अनुभव यायचा .. जरूर जरूर सगळ्यांनी घ्यावं आणि स्वतः वाचावं, मुलांना, नातवंडांना वाचायला द्यावं. भाषाही समृद्ध होईल आणि विचारही ! इतके संस्कार ओतप्रोत भरलेत प्रत्येक गोष्टीमध्ये.. कुठले गुण आपण का अंगीकारावेत हे अतिशय सोप्या भाषेत नेमकेपणाने समजावलं आहे. मन प्रसन्न होतं वाचताना. लहानपणापासनं आता पावेतो शंभराहून अधिक वेळा वाचल्या असतील ह्या कथा, पण त्यांतली गोडी संपतच नाही. धन्यवाद ही पुस्तकं पुन्हा एकदा उपलब्ध करून दिलीत. खरंच खूप खूप आभार.. मी पहिलीत असल्यापासनं वाचतेय .. आणि तुम्ही .... ?? नक्की वाचा ... नवीन संस्कारक्षम, संवेदनशील, धैर्यवान आणि सुजाण पिढी घडवण्याचा फार उत्तम उपाय आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat