Home
>
Books
>
साहित्य आणि समीक्षा, संगीत विषयक
>
Sundara Manamadhi Bharali Marathi Lavani Vangmayatil Soundrya Ani Samiksha - सुंदरा मनामधि भरली मराठी लावणी वाङ्मयातील सौंदर्य आणि समीक्षा
Hard Copy Price:
25% OFF R 320R 240
/ $
3.08
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
लावणी वाङ्मयातील सौंदर्याचे दर्शन घडविणारे आणि समीक्षा करणारे पुस्तक म्हणजे ‘सुंदरा मनामधि भरली’. यासाठी त्यांनी त्या काळी गाजलेल्या शाहिरांच्या अनेक लावण्यांचा वेध घेतला आहे. यातल्या बर्याचशा लावण्या आपल्या परिचयाच्या असल्या तरी अनेक नवीन लावण्यांचा या पुस्तकामुळे परिचय होतो. डॉ. घाटे यांचे व्यासंगी विवेचन या लावण्यातील मर्मस्थळे उलगडून दाखवते.
लावणी हा काव्यप्रकार आशय आणि रचना या दोन्ही दृष्टींनी खास मराठी परंपरेतून आलेला आहे. स्त्री-पुरुषांच्या शृंगारिक आणि वैराग्यपर भावनांना आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे लावणी हे एक साधन होते. श्रीमंत पेशवे, त्यांचे सरदार, दरकदार हे फाल्गुन महिन्यातल्या शिमग्याच्या सणात तमासगीर मंडळींना खास आमंत्रण देऊन लावण्या ऐकत. त्यासाठी नेहमीच्या लावण्यांसोबत खास रंगोत्सवासाठीही लावण्या रचल्या जात.
उत्तर पेशवाईत मराठी शाहिरांच्या प्रतिभेला बहर आला होता. मराठी स्त्री-पुरुषांच्या प्रेमाचे चित्रण करणारे लावणी वाङ्मय भरभरून लिहिणारे शाहीर रामजोशी, होनाजी अनंत फंदी, प्रभाकर, सगनभाऊ आणि परशराम यांच्या जीवनासंबंधी आणि तत्कालीन मराठी भाषेत लिहिलेल्या त्यांच्या लावण्यांविषयी आजतागायत मराठी माणसांच्या मनात कुतूहल आणि आकर्षण आहे. ‘सुंदरा मनामधि भरली’मध्ये डॉ. शरद घाटे यांनी रसिक वाचकांची ही गरज उत्तमरीत्या भागविली आहे. उपरनिर्दिष्ट सहाही लावणीकारांच्या शृंगारिक, उत्तान शृंगारिक आणि सात्विक शृंगाराच्या लावण्यांचा आजच्या मराठीत सुरस अनुवाद केला आहे. त्या शाहिरांच्या जीवनासंबंधीची सर्व उपलब्ध माहिती एका प्रकरणात दिली आहे. लावणीची व्याख्या, लावण्यांचे प्रकार वरील सर्व लावणीकरांच्या काव्यात्म लावण्यांची समीक्षा देऊन वाङ्मयाच्या अभ्यासकांचीसुद्धा सोय करण्यात आली आहे. मागच्या पिढीतील मान्यवर समीक्षकांसह एकविसाव्या शतकातील समीक्षकांच्या मतांचाही या ग्रंथात सांगोपांग विचार केला आहे.