खूप सुंदर पुस्तक आहे. गांधीहत्या आणि त्याची करणे, गांधीजींच्या मारेकऱ्यांमधील फासीवर चढवलेल्या गुन्हेगारांपासून निर्दोष सुटलेल्या आरोपींपर्यंत, फाळणीच्या मूळ आणि वास्तव कारणांपासून सांप्रदायिक संस्थांनी पसरवलेल्या भडकाऊ असत्य आणि विद्वेषक प्रोपागंडापर्यंत.... सर्वांची चिकित्सा करणारे ससंदर्भ पुस्तक. जगन फडणीस यांचे 'महात्म्याची अखेर', य.दि.फडके यांचे 'नथुरामायण', तुषार गांधी यांचे 'लेट्स किल गांधी', राम पुनियानी-विवेक कोरडे यांचे 'गांधीहत्येचे राजकारण' या पुस्तकांच्या नामावलीत हे पुस्तक तितक्याच क्षमतेने उठून दिसते यात शंका नाही.