उत्तम लिखाण. मनापासून धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा
S.D.Gokhale
04 Jul 2012 05 30 AM
सुपर्णा तांबे,
नमस्कार.
पुस्तक डाऊनलोड करून वाचल्याबद्दल हार्दिक धन्यवाद!
या महान त्यागी देशभक्ताच्या कार्यकर्तृत्वाची निदान तॊडओळख तरी नव्या पिढीला असावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. ते अधिकाधिक लोकांनी वाचावे ही आंतरीक इच्छा!
पीडिएफ फाईल बहुदा करता येत नसावी. ही बाब पब्लिशर यांच्या हाती आहे.
- शशिकांत गोखले
A. Patil
04 Jul 2012 05 30 AM
(continued)
आपल्या लेखनात त्यांच्या या गुणांचा ओळीओळीतून प्रत्यय येत राहातो.
पुस्तकातील फोटोंनी एकूणच लिखाणाला सौष्ठव प्राप्त करून दिले आहे.
एका चांगल्या वाचनानुभवाचा आनंद देऊ केल्याबद्दल आपले अंतःकरणपूर्वक आभार मानतो.
--- अशोक पाटील
Ashok Patil
04 Jul 2012 05 30 AM
नमस्कार सर, तुम्ही अत्यंत श्रमपूर्वक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन काल रात्री ज्यावेळी पूर्ण झाले त्यावेळी आलेल्या त्या दिव्य अनुभूतीला
शब्दबद्ध करण्यासाठी की बोर्डवर बोटे टेकविली तर जरूर. पण त्यावरून फिरायलाच तयार नाहीत. कारण माझी नजर खिळली होती ’सावरकर कोठडी’ फोटोवर!
माझ्याच नव्हे तर करोडो देशवासियांसाठी खऱया अर्थाने ती कोठडी म्हणजे एक मंदीरच होय! मी गेलो आहे तिथे आणि प्रवेश करताच एका विलक्षण प्रबळ इच्छेने
तिथे माथा टेकला होता. क्षणाक्षणाला मृत्यूची सावली तात्यांच्या भोवती तेथे घुमत असतांना त्या मृत्युकडे निडरपणे पाहाणारे ते तेज......
तात्यांना दीर्घायुष्य लाभले त्यात त्यांच्या करारी स्वभावाचेच दर्शन होते. तसल्या अंगावर क्षणोक्षणी काटा उमटविणाऱ्या वातावरणात राहूनही ते उदास झाले नाहीत
कि कधि त्यांनी हाय खाल्ली. होती ती निर्मळ, निर्भेळ देशभक्ती त्यांच्याजवळ!
Great work by Author. Thank you very much for allowing us to download it for free!!
I have one question.. Can't we save the downloaded file to our computer as PDF?
सर्व ताकदीनिशी परकीयांवर तुटून पडण्याची वृत्तीच, हजारो वर्षांच्या गुलामगिरीत , कुठेतरी हरवून गेली होती. त्याला छेद देण्यासाठी असेच कोणी राणा प्रताप, कोणी शिवराय आणि अलिकडे सावरकर होऊन गेले. सावरकरांनी नुसता लढाऊपणाच नव्हे तर विज्ञान निष्ठेचाही पुरस्कार केला. पण दुर्दैव आमचे! विज्ञाननिष्ठ म्हणुन हिंदूनी विरोध आणि हिंदुत्ववादी म्हणुन इतरधर्मीयांनी विरोध केला. परीणामी तात्याराव एकटेच राहिले.या पुस्तिकेत राष्ट्र्हीत डोळ्यासमोर ठेवून प्रेरणादायी अशा या आधुनिक विनायकाचे वैचारीक अष्टविनायक दर्शन घडविले आहे. अशा प्रकारच्या प्रेरणादायी कार्याची पुनःपुन्हा अपेक्षा!
Very infomative & inspiring for young generation. I fully agree with shri. PRABHAKAR. I found out the address & mo. no. of the author :- 4/39, Vidyanagar- 2, Near civil hospital , SOLAPUR-413003. Mobile- 9850716596. On cotacting the author, I found that the author has welcomed the valuable suggestion of "prabhakar" and will soon start working on publishing of English & Hindi versions.
Prabhakar
04 Oct 2011 05 30 AM
Excellent book on Veer Savarkar written with different perspective. In maharashtra we have 8 Ganesh- also known as Vinayak- temples of great importance which are pilgrimage centres and people visit them. This visiting 8 Vinayak temples is called as Astavinayak Darshan. Author has nicely chosen the same word but here Vinayak is not God Ganesh but Veer Savarkar whose first name happens to be Vinayak. Author has chosen 8 important places in Savarkar's life where he urges all patriotic Indians to visit and energize themselves. Book is very nice and reflects Author's love and respect for Veer savarkar. I hope Author also translates this book in Hindi and English for benefit of people in other parts of India.Younger generation of Maharashtrians settled abroad may not be able to read Marathi book properly and that is why English translation.
श्याम
04 Jun 2011 05 30 AM
अष्ट विनायक दर्शन वाचून काय वाटले हे कसे सांगू ?वाचताना कधी मन आनंदित झाले कधी छाती गर्वाने फुगली तर कधी हुंदकाही अनावर झाला.खरोखर हे सावरकरदर्शन अतिशय मनोज्ञ
विवेक घळसासी, सोलापूर
04 Apr 2011 05 30 AM
या विशाल शब्दसागरात प्रा.गोखले यांची ही पुस्तिका एखाद्या ओहळासारखी येऊन मिसळत आहे. ओहळ म्हटले ते केवळ पुस्तिका आहे म्हणूनच! गुणवत्तेच्या कसोटीवर तिच्यात कसले लघुत्व नाही हे नमूद केले पाहिजे.धार्मिक अंगाने अष्टविनायकदर्शनाचे जसे मोल आहे तसेच हे अभिनव विनायक दर्शन राष्ट्रीय संदर्भात मोलाचे आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी ज्या वास्तूत सावरकरांचा जन्म झाला तेथून मुंबईच्या ’ सावरकर सदन ’ या वास्तूत सावरकरांनी जेथे चिरनिद्रा घेतली येथवर , सावरकरांच्या जीवनातील महत्वाच्या अन्य सहा ठिकाणांचा आढावा घेत प्रा. गोखले यांनी या यात्रेची गुंफ़ण केली आहे. श्रद्धा आणि अभ्यास या दोन्ही अंगाने प्रा. गोखले यांनी केलेली ही यात्रा रसपूर्ण, अर्थपूर्ण तर आहेच पण ही स्थलदर्शने घेण्याची प्रेरणा देणारीही झाली आहे. प्रा. गोखले यांचे यासाठी मनःपूर्वक अभिनंदन !
श्री बावगे, लातूर
04 Apr 2011 05 30 AM
हे विनायकदर्शन मला फारच आवडले. आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! हे पुस्तक
" गागरमे सागर " असेच झाले आहे. विद्यार्थीजीवन घडविण्यास सावरकरांच्या जीवनाशिवाय आदर्श दुसरा असूच शकत नाही. जयहिंद!
प्रभाकर नूलकर
04 Apr 2011 05 30 AM
प्रसिद्ध पत्रकार श्री प्रभाकर नूलकर म्हणतात-"इतकी जाज्वल्य देशभक्त्ती, निरपेक्ष त्यागबुद्धी, विलक्षण धडाडी व तितकीच चिवट सहनशक्ती,समाजहितैशी कळकळ,क्रांतदर्शी बुद्धिमत्ता,मूलग्राही विज्ञाननिष्ठा, श्रोत्यांच्या रोमारोमात थरार निर्माण करणारी अशी अमोघ वक्तृत्वकला, अद्भुत काव्य प्रतिभा एकाच व्यक्तिमत्वात भरून राहिली असावी हा एक ईश्वरी चमत्कारच म्हटला पाहिजे. जगन्नियंत्याने ही महापुरुषाची वेगळीच मूस बनविली व लगेच त्याने ती मोडूनही टाकली. "परंतु या सम हा " ही काव्यपंक्ति जर कुणाला चपखलपणे शोभून दिसत असेल तर ती एकाच व्यक्तिला - विनायक दामोदर सावरकर यांना! याच विनायकाचे अष्टस्वरूपात दर्शन घडवून आणण्याची प्रेरणा गोखल्यांना झाली आणि ती त्यांनी उत्तम प्रकारे तडिसही नेली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आभार! शशिकांतरावांच्या सावरकर भक्तीला आलेले हे मधूर फळ आहे. अष्टविनायकदर्शनाच्या स्थानमहात्म्याबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आठ दैदिप्यमान पैलुंकडेही गोखल्यांनी लक्ष वेधविले आहे आणि या दर्शनाला परिपूर्णताआणलीआहे.आधुनिक विनायकाचे हे अष्टगुणदर्शन नव्या उभरत्या पिढीला पुस्तकरूपाने करून देणे हि काळाची गरज आहे यात शंका नाही