Summary of the Book
इतिहास जाणून घेण्याची आवड लहानपणापासूनच प्रत्येकाला असते. संस्कृतींचा जन्म कसा झाला, हे जाणून घेण्यासाठी भारतीय, इजिप्शियन, चायनीज, बॅबिलोन यांचा अभ्यास करणे अतिशय रंजक आहे. एक नागरिक म्हणून हे चार धाम बघण्याची डॉ. विलास घैसास यांची इच्छा होती, त्याचीच ही कहाणी. इजिप्त एक सफरनामा या पुस्तकातून घैसास यांनी इजिप्तचा इतिहास, भूगोल आणि प्रेक्षणीय स्थळांची माहिती दिली आहे.
यात अलेक्झांड्रिया, येथील लायब्ररी, पिरॅमिड्स, कैरोचे प्रसिद्ध म्युझियम, व्हॅली ऑफ किंग ऍण्ड क्वीन- कर्णाक, नाईल, तुतनखामेन आणि कर्स ऑफ ममी अशा गूढ रहस्यांची उकल केली आहे. त्याचबरोबर इजिप्शियन लिपी, बेली डान्स अशा संस्कृतीच्या खुणांची माहितीही दिली आहे. या सगळ्याची माहिती देताना घैसास यांनी गोष्टी स्वरूपात, आकडेवारी आणि चित्र, नकाशाचा वापर करून इजिप्तची सफर घडविली आहे.