Summary of the Book
शिष्यवृत्ती परीक्षेविषयी विद्यार्थी व पालकांमध्येही जागरुकता आली आहे. नेहमीच्या अभ्यासक्रमाशिवाय वेगळा अभ्यास मुलांना असावा आणि व्हावा, महाविद्यालयीन जीवनात द्याव्या लागणाऱ्या स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, हाही हेतू त्यामागे असतो. म्हणूनच शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातील विषयांचा अभ्यास करून घेऊन सरावासाठी प्रश्नपत्रिका 'पैकीच्या पैकी' या तीन पुस्तकांच्या सेटमध्ये दिल्या आहेत.
इंग्लिश हाय लेव्हल, मराठी लो लेव्हल, मॅथेमॅटिक्स, सोशल सायन्स, इंटेलिजन्स टेस्ट, जनरल सायन्स या विषयांवरील सर्व अभ्यास वा. ना. दांडेकर यांनी यातून करून घेतला आहे. भाषा विषयांची अगदी प्राथमिक व्याकरण, कॉप्रहेंन्शनपासून सर्व माहिती दिली आहे. सरावासाठी ८०० प्रश्न, गणित लवकर सोडविण्यासाठी सोप्या पद्धती, सूत्र, जनरल इंटेलिजन्सची प्राथमिक माहिती, विषयाचे विवेचन कसे करायचे, याविषयी माहिती दिली आहे.