चित्रपटाच्या मायानगरीचे आकर्षण कोणाला नसते? प्रत्यक्ष चित्रपटाशी संबंध आला नाही, तरी तो पाहण्याची हौस असतेच. पुढे जाऊन चित्रपटांबद्दल जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते.
चित्रपटनिर्मिती, त्याविषयीचे किस्से, अभिनेते, अभिनेत्री यांच्याविषयीचे कुतूहल शमविण्यासाठी इसाक मुजावर यांचे ‘सिनेमाचा सिनेमा’ हे पुस्तक वाचायला हवे.
यात जुन्या काळातील अनारकली, मदर इंडिया, देवदास, संगम आदी २६ चित्रपटनिर्मितीच्या आठवणी कथन केल्या आहेत.