Summary of the Book
सदर ग्रंथ हिंदू-मुस्लिम प्रश्नाचे मूळ शोधणारा,
तो सोडविण्यासाठी मार्ग स्पष्ट करणारा, हिंदू आणि मुस्लिमांच्या
'आध्यात्मिक राजकारणाच्या' हितसंबंधांवर प्रकाशझोत टाकणारा
आहे. त्याचप्रमाणे गांधी-आंबेडकरांच्या मलिन केल्या गेलेल्या
प्रतिमांना त्यांच्या मूळ स्वरुपात उजाळा देणारा, स्वा. सावरकरांच्या
जीवन-अस्तित्वातील द्वैताचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण करून त्यांचे
व्यक्तिमत्व स्पष्ट करणारा आणि जागतिक राजकीय तत्वज्ञानाच्या
प्रकाशात सावरकरांच्या हिंदूराष्ट्रवादाची समीक्षा करणारा आहे.