ठिगळ अन् टाके
Pare Rajendra Pare पारे राजेंद्र पारे
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 175 R 131 / $ 1.68
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सम्यक आणि धाम्माविचारांची नवनव्या पिढ्यांनी आपल्या अस्तित्वाची आणि अस्मितेची ओळख समाजव्यवस्थेला करून दिली. पुस्तक हाती पडलं आणि सारा अन्याय, अत्याचाराचा इतिहास बदलविण्याची धमक पिढ्यांमध्ये आली अशा जाणिवा प्रगल्भ असणाऱ्या पिढीतलं नाव राजेंद्र पारे आहे. जीवनात वास्तवतेचा अनुभव घेत आपल्या लेखणीतून व्यक्त होणाऱ्या ह्या कवीनं गरिबीचं अवडंबर न माजविता त्यावर मात करीत स्वतःला घडवत समजाव्यवस्थेला आपली कविता, विचार देण्याचा प्रयत्न ते करीत असतात. 'ठिगळ अन टाके' हे कवितासंग्रहाचं शीर्षक सूचक आणि भोगलेल्या पिढ्यांचं दु:ख आहे.
काही जीवांसाठी
जीव ओतणारी जमात
आणि
काही जीवावर
जीव घेणारी गिधाडे जमात
हा संघर्ष पिढीजात सुरूच आहे. ह्या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण माणसांच्या ह्या बाजारात कवीला हा संघर्ष थांबवण्याची चिन्हे दिसत नाहीत. चळवळीचा इतिहास साऱ्यांना माहिती आहे. चळवळीची दशा आणि दिशादेखील ज्ञात आहे. पण चळवळीशी प्रामाणिक असणाऱ्या ह्या कवीनं आपला बाप कार्यकर्त्यांनं विसरू नये किंबहुना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान आपल्या साऱ्यांच्याच जीवनात किती महत्वपूर्ण आहे हे मांडताना कवी म्हणतात,
तो किंचित हसत
जणू धुत्कारतच म्हणाला...
अडाणी माणूस मी
प्राणास त्यागेन पण...
बापालाच 'बाप' म्हणेन मी
नव्या पिढीला आपल्या अनेक पिढ्यांची बापाची ओळख करून देणारे कवी राजेंद्र पारे यांची साहित्यिक वाटचाल नव्या उमेदीची, नव्या संघर्षाची आणि नवविचारांची देखील आहे. आपल्या आईच्या कष्टाची जाणीव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणविषयक विचार अंगीकारत अध्यापन करताना नव्या पिढीच्या जीवनात शिक्षणाची सूर्यपहाट आणण्याचा त्यांचा प्रयत्न सर्वश्रुत आहेच. बुद्धांचा विज्ञानवादी विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा माणूस घडविण्याचा विचार कवी वास्तवतेचं भान जपत कवितासंग्रहातून मांडतात. त्यांच्या शब्दांचं स्वागत! मन:पूर्वक शुभेच्छा!
Book Review
Write a review

किरण शिवहर डोंगरदिवे
29 Oct 2020 02 33 PM

व्यवस्थेवर प्रहार करणारी सहजगम्य कविता ठिगळ अन् टाके कविता हा जगण्याचा आविष्कार आहे.माणसाची अभिव्यक्ती चित्रित करणाऱ्या एक महत्वाच्या माध्यमांपैकी एक माध्यम म्हणजे काव्य होय असे मला प्रकर्षांने वाटते.माध्यमे ह्या विषयी बोलायचे तर आज तंत्रज्ञानाच्या नावाखाली अभिव्यक्ती होण्यासारखे प्रांजळ ठिकाण राहिलेले नाही.व्हाट्सएप,फेसबुक ह्यांनी जनजीवन व्यापून टाकले आहे. प्रचंड अस्वस्थता आणि गुदमरलेपणा साचलेले आहे. असेच युगायुगांची अस्वस्थता अस्वस्थता आणि गुदमरलेपणाला वाट करून देण्यासाठी काही प्रामाणिक कवी निष्ठेने प्रयत्न करताना दिसतात.त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे राजेंद्र पारे हे होय.राजेंद्र पारे ह्यांचा 'ठिगळ अन् टाके' हा कवितासंग्रह वाचनात आला आणि कवितेच्या नावावर कोणीही काहीही लिहिण्याच्या काळात सुंदर आणि निकोप कविता अजूनही प्रसवत असल्याचे समाधान लाभले. आई असते शिदोरी जगी पुरून उरणारी अत्त दीप भव ला जागणारी असे जेव्हा मी वाचले तेव्हा आई असते शिदोरी पुरतही नाही अन् उरतही नाही असे म्हणणारे फ.मु.शिंदे आठवलेच पण त्याच कवितेत जेव्हा
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat