Books On Books ह्या प्रकारचं लिखाण आपल्याकडे मोजक्याच प्रमाणात होत तेवढी आपली वाचन संस्कृती सुलभ झाली नाही आहे आणि त्यात हे पुस्तकं मोलाची भर टाकणार आहे
लेखक निखिलेश चित्रे शेवटी मनोगत मधे म्हणतो की" पुस्तकांच्या शोधात आडवाटेला वळल्यावर पुढे त्या आडवाटेला अनेक फाटे फुटतात. वाचनाच्या अंगणात पाऊल ठेवणाऱ्या वाचकानं त्या वाटांनी पुढे जाऊन स्वतःचे लेखक शोधले, त्यातून त्याला खास त्याच्या अशा नव्या आडवाटा सापडल्या, तर आनंद होईल"
अगदी असंच होतं हे पुस्तक वाचून पुढे जाताना, हे पुस्तक वाचल्यावर मला ही नव्या आडवाटा सापडायला लागल्या आहेत त्यात काही आधीच मित्रांनी सुचवलेली पुस्तकही आहेत आणि काही एकदम नवीन पुस्तकं सुद्धा आहेत...
वाचनसंस्कृती साजरी करणारं अप्रतिम पुस्तक.कधी नावही न ऐकलेले देशोदेशीचे लेखक,त्यांची पुस्तकं आणि त्यांच्याशी संबंधित किस्से,माहिती,आठवणी- असं बरंच काही.
तुमचं पुस्तकांवर प्रेम असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं असं आहे. मी यातल्या पुस्तकांची नावं लिहून त्यांची एक यादीच तयार केलीय. आता ती सगळी पुस्तकं शोधून वाचणार आहे.