Summary of the Book
ह्या गोष्टी आहेत सांगण्यासाठी! म्हणजे स्पर्धेत, कार्यक्रमात, वर्गात, अगदी घरीसुद्धा. एकट्यानं करण्यासारखं नाटकच वाटेल हे! ह्यातले विषय सुद्धा एकदम ढांसुऽऽ आहेत. विज्ञानकथा आहे, ग्रामीण कथा आहे, अगदी शाळेतली फुल टू… धम्माल पण आहे. काही तालकथा आहेत. विशेष करून किशोर गटासाठी ह्या कथा असल्या तरी सर्व वयोगटातील मुलांना आवडतीलच अशा आहेत. मुलांसोबत पालकांनी बसून वाचल्या तर त्यांनाही मज्जा येईल. आणि एखादा शब्द मुलांना अडलाच तर डिक्शनरीचा रोल करावा लागेल, आधीच सांगून ठेवतो! मुलांनी आणि पालकांनी वाचल्याच पाहिजेत अशा ह्या १३ आगळ्या वेगळ्या ‘प्रयोग’ कथा आहेत.